Dhirubhai Ambani यांनी संघर्षातून उभं केलं रिलायन्सचं साम्राज्य, मुलांसाठी मागे सोडून गेले इतकी संपत्ती

Dhirubhai Ambani Birthday | गुजरातमधील एका सर्वसामान्य कुटुंबात धीरुभाई अंबानी यांचा जन्म झाला. रिलायन्स समूहाचा आजचा डोलारा पाहिला तर कोणाला ही विश्वास बसणार नाही की शून्यातून ही सुरुवात झाली होती म्हणून. मोठा संघर्ष आणि कुटुंबात पैशांची तंगी असतानाही त्यांनी रिलायन्सचे रोपटे लावले.

Dhirubhai Ambani यांनी संघर्षातून उभं केलं रिलायन्सचं साम्राज्य, मुलांसाठी मागे सोडून गेले इतकी संपत्ती
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 2:58 PM

नवी दिल्ली | 28 डिसेंबर 2023 : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा आज 28 डिसेंबर रोजी जन्मदिन. जर ते हयात असते तर आज 91 वर्षांचे असते. गुजरातमधील एका सर्वसाधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांची व्यावसायिक जगतातील सुरुवात एकदम कठिण होती. त्यांना हे साम्राज्य उभं करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. कुटुंबाकडे पैशांची चणचण होती. त्यामुळे त्यांना इयत्ता दहावीनंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांना नोकरीसाठी कमी वयातच यमनला जावे लागले. त्यांनी पेट्रोल पंपावर नोकरी केली. त्यांची व्यवसायाची बाराखडी पक्की होती. तावून सलाखून धीरजलाल हिराचंद नंतर धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) झाले.

500 रुपयांत कंपनीची स्थापना

खिशात 500 रुपये घेऊन धीरुभाई मुंबईत दाखल झाले. चंपकलाल दिमानी यांच्यासोबत त्यांनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून पश्चिमी देशात अद्रक, हळद आणि इतर मसाले पाठविण्याचे काम सुरु केले. भविष्यात काळात पॉलिस्टर कपड्यांची मागणी वाढणार हे हेरुन त्यांनी यामध्ये नशीब आजमावण्याचा विचार केला. त्यातूनच पुढे पेट्रोकेमिकल, रिफायनिंग, टेलिकॉम आणि इतर क्षेत्रात त्यांचा व्यवसाय वाढला.

हे सुद्धा वाचा

आयुष्याचा सारीपाट

  1. धीरुभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 रोजी गुजरातमधील एका गावात झाला.
  2. त्यांचे वडील शिक्षक तर आई गृहिणी होती. पाच भाऊ आणि बहिण असे त्यांचे कुटुंब होते.
  3. गिरनार पर्वतावर ते खाद्यपदार्थाची विक्री करत होते. आलेला पैसा ते आई-वडिलांना द्यायचे.
  4. दहावी परीक्षा पास झाल्यावर 1949 मध्ये ते भाऊ रमणीकलाल यांच्याकडे यमन देशात गेले.
  5. त्यांनी एका पेट्रोल पंपावर नोकरी केली. 300 रुपये महिना पगार होता.
  6. त्यांनी पॉलिस्टर कपड्यांचे उत्पादन आणि विक्री सुरु केली. त्यांनी पहिला ब्रँड Vimal सुरु केला.
  7. रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशनसाठी मुंबईत 350 वर्ग फुटाचे कार्यालय भाडेतत्वावर घेतले.
  8. या कार्यालयात एक टेबल, तीन खुर्च्या, रायटिंग पॅड एवढ्याच वस्तू होत्या.
  9. 1966 मध्ये त्यांनी गुजरात राज्यात अहमदाबाद येथे एक कापड मिल सुरु केली.
  10. या मिलचे नाव त्यांनी रिलायन्स टेक्सटाईल्स असे ठेवले.
  11. 1977 मध्ये त्यांची कंपनी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली.

किती संपत्तीचे होते मालक

धीरुभाई अंबानी हे त्यांच्या काळात भारतातील सर्वात मोठे श्रीमंत होते. 2002 मध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला तेव्हा ते जगातील 138 वे श्रीमंत होते. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 2.9 अब्ज डॉलर इतकी होती. आताच्या डॉलर-रुपयात त्याचे मूल्य 24 हजार कोटी रुपये होते. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारातील भांडवल 17.50 लाख कोटी रुपये पोहचले आहे. तर त्यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य 60 हजार कोटी रुपेय होते.

Non Stop LIVE Update
उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, ठाकरेंची जळजळीत टीका
उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, ठाकरेंची जळजळीत टीका.
'दगा एक बार हो सकता है, बार बार...', नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा
'दगा एक बार हो सकता है, बार बार...', नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा.
भेटता कसले,हिम्मत असेल तर राजीनामा द्या; आव्हाडांचं दादांना खुल आव्हान
भेटता कसले,हिम्मत असेल तर राजीनामा द्या; आव्हाडांचं दादांना खुल आव्हान.
वेळ आली तर ठाकरेंसाठी तलवारीचे वार घेऊ... त्या बॅनर्सची का होतेय चर्चा
वेळ आली तर ठाकरेंसाठी तलवारीचे वार घेऊ... त्या बॅनर्सची का होतेय चर्चा.
मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?
मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?.
मी ओरिजनल,शेवटी ब्रँड हा ब्रँड, नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांवर पलटवार
मी ओरिजनल,शेवटी ब्रँड हा ब्रँड, नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांवर पलटवार.
मिटकरीला ना कोणता अधिकार, त्यांनी तोंड बंद ठेवाव, भाजप नेत्यान फटकारल
मिटकरीला ना कोणता अधिकार, त्यांनी तोंड बंद ठेवाव, भाजप नेत्यान फटकारल.
मोदींना आता राहुल गांधींना रामराम करावा लागेल, राऊत नेमकं काय म्हणाले?
मोदींना आता राहुल गांधींना रामराम करावा लागेल, राऊत नेमकं काय म्हणाले?.
गुन्हा आहे का?, लोकसभेतील 'त्या' घोषणेनंतर राऊतांकडून ओवैसींची पाठराखण
गुन्हा आहे का?, लोकसभेतील 'त्या' घोषणेनंतर राऊतांकडून ओवैसींची पाठराखण.
कुठला विषय शिकवता हे विचारण्याची गरज काय?,किशोर दराडेंनी कुणाला सुनावल
कुठला विषय शिकवता हे विचारण्याची गरज काय?,किशोर दराडेंनी कुणाला सुनावल.