400 रुपयांच्या कर्जावर उभारला व्यवसायाचा डोलारा, आज डायमंड टायकून म्हणून व्यावसायिकांचे प्रेरणास्थान

हिरे व्यवसायातील धनकुबेर गोविंद ढोलकिया यांचा जीवनप्रवास अनेक व्यावसायिकांना प्रेरीत करणारा आहे. अवघ्या 400 रुपयांच्या कर्जावर सुरु केलेला व्यावसायिक प्रवास त्यांना धनकुबेर करुन गेला. यामागे त्यांची मेहनत, जीवनमूल्य आणि कष्ट आहेत.

400 रुपयांच्या कर्जावर उभारला व्यवसायाचा डोलारा, आज डायमंड टायकून म्हणून व्यावसायिकांचे प्रेरणास्थान
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 12:33 PM

जीवनात यशस्वी झालेल्या अनेकांचा प्रवास वाटतो तितका सोपा नसतो. सुरुवातीचा संघर्षानंतर साम्राज्य उभारता येते. हिरे व्यापारी गोविंद ढोलकिया (Diamond tycoon Govind Dholakiya) यांचा जीवनप्रवास (Life Journey) आता लोकांसमोर आला आहे. त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची आणि खाचखळग्यांची माहिती आत्मकथेतून समोर आली आहे. ‘ Diamonds Are Forever, So Are Morals’ या नावाने हे आत्मचरित्र (Autobiography) बाजारात दाखल झाले आहे. त्यात ढोलकिया यांच्या व्यावसायिक जीवनाची गाथा समोर आली आहे. व्यावसायिक गुण जोपसताना जीवनाचे मूल्य त्यांनी कधी त्यागले नाही. हेच या जीवनाचे सार आहे. अवघ्या 400 रुपयांच्या कर्जावर सुरु झालेला हा प्रवास धनकुबेर झाल्यावरही अविरत सुरु आहे. ढोलकिया हे काही पहिल्या दिवसापासून धनकुबेर नव्हते. त्यांच्या पहिल्या व्यावसायिक करारासाठी त्यांना 920 रुपयांची आवशक्यता होती. त्यासाठी त्यांनी मित्र आणि शेजा-यांकडून कर्ज घेतले होते. या कर्जातून त्यांनी त्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.

हि-यांचे उत्पादन आणि निर्यात करणारी कंपनी श्री रामकृष्ण एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड (Shree Ramkrishna Exports Pvt Ltd) चे संस्थापक आणि अध्यक्ष गोविंद ढोलकिया यांनी त्यांच्या आत्मकथेत त्यांच्या पहिल्या व्यावसायिक कराराची माहिती दिली आहे. जून्या आठवणीत रमताना आणि भूतकाळ आठवताना हा व्यवसाय कधी सुरु केला, याची माहिती ढोलकीया यांनी दिली आहे. त्यानुसार, जानेवारी 197ॉ0 साली त्यांनी व्यवसाय सुरु केला होता. 1970 मधील जानेवारी महिन्यातील शेवटचा रविवार होता. ते एका क्रिस्टल बॉल रिडिंगच्या दुकानात गेले होते. तेव्हाच त्यांना खरबडीत हि-यांना आकार देण्याचा आणि पॉलिश करण्याच्या व्यवसायाची कल्पना सूचली.

मित्र आणि शेजारच्यांमुळे जमा झाले 920 रुपये

व्यवसायाला सुरु करण्यासाठी त्यांना 920 रुपयांची आवश्यकता होती. ते बाबुभाई रिखवचंद दोशी आणि भानुभाई चंदुभाई शाह यांच्या कार्यालयात गेले होते. त्यांनी एक कॅरेट हि-याचा भाव 91 रुपये सांगितला आणि कमीतकमी 10 कॅरेट हिरे घेण्याची अट घातली. हि-याच्या किंमतीसाठी 910 रुपये तर ब्रोकरेजसाठी 10 रुपयांची आवश्यकता होती. तर ढोलकिया यांच्याकडे केवळ 500 रुपये होते. पण त्यांच्या घरी एवढी मोठी रक्कम नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांचे मित्र वीरजीभाई यांच्याकडे मदतीचा हात मागितला. त्यांच्याकडे घर खर्चासाठी बाजूला काढून ठेवलेले 200 रुपये होते. ते त्यांनी दिले. तर वीरजीभाई यांच्या शेजा-याकडून 200 रुपयांचे कर्ज घेऊन व्यवसायाचा असा श्रीगणेशा झाला होता.

10 टक्के फायदा

पूर्ण रक्कम दिल्यानंतर त्यांना हिरा देण्यात आला. त्याला आकार देऊन आणि पॉलिश करुन त्यांनी एक आठवड्यानंतर तो बाबूभाई यांना 10 टक्के फायद्यासह विकला. त्यांच्या कामावर बाबूभाई प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना आणखी हिरे दिले. ढोलकिया हि-यांना दैवत मानतात. नैतिकता, आदर्श आणि जीवन मुल्यांमुळे व्यावसायिक यश गाठल्याचे ढोलकिया सांगतात.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.