जग म्हणत होते कपाळकरंटा; आज हेवा वाटतोय नशीबाला, पिझ्झा गॅलेरियाच्या मालकाची सक्सेस स्टोरी वाचली का?

Pizza Galleria Sandeep Jangra | हरियाणातील गोहाना या छोट्या शहरातून या तरुणाने दिल्ली सारख्या मेट्रो शहरात स्वतःचा व्यवसाय थाटला. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. पाया उभं राहण्याचे त्याचे स्वप्न सहजासहजी साकारले नाही. त्याअगोदर त्याला अनेक टोमण्यांचा सामना करावा लागला.

जग म्हणत होते कपाळकरंटा; आज हेवा वाटतोय नशीबाला, पिझ्झा गॅलेरियाच्या मालकाची सक्सेस स्टोरी वाचली का?
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 9:38 AM

नवी दिल्ली | 13 February 2024 : सध्या भारतात गाजत असलेला टीव्ही रिएलिटी शो शार्क टँकमध्ये एका 32 वर्षीय तरुणाला तुम्ही पाहिले असेल. संदीप जांगड यांची कंपनी पिझ्झा गॅलेरिया, देशातील अनेक शहरात डॉमिनोज सारखे ब्रँड असताना दिमाखात उभी आहे. आज जांगड यांच्या या कंपनीचे नेटवर्थ आज 50 कोटी रुपये आहे. पण या पिझ्झा कंपनीचे मालक संदीप जांगड यांचा हा प्रवास हा काही सोपा नव्हता. त्याअगोदर त्यांना अनेक टोमणे आणि अपयशाला सामोरे जावे लागले. अनेक अडथळे आले. पण त्यांनी नशिबालाच हुलकावणी दिली आणि स्वतःचे साम्राज्य उभे केले.

अपयशाची मालिका

हरियाणातील छोटे शहर गोहाना जवळील काठमंडी येथील संदीप जांगड यांची स्वप्न मोठी होती. 2009 मध्ये त्यांनी बीटेकला प्रवेश घेतला. वडिलांचे ते स्वप्न होते. पण संदीप बीटेक पूर्ण करु शकले नाहीत. ते नापास झाले. मध्यमवर्गीय कुटुंबाला हा धक्का पचविणे अवघड असते, म्हणून त्यांनी बीटेक पूर्ण झाल्याची थाप मारली आणि एक कंपनीत नोकरी सुरु केली. ही नोकरी अवघ्या दहा हजार रुपयांची होती. तर त्यांच्या रुमचे भाडे नऊ हजार रुपये होते. मित्रांसोबत रुम शेअर करुन ते राहत असत. पण ही नोकरी काही टिकली नाही. नोकरी सोडून ते घरी आले. त्यांच्या शहरात हार्डवेअरची दुकान टाकली. पण त्यातही त्यांचे मन रमले नाही. अपयशाचा जणू शिक्काच माथ्यावर बसला.

हे सुद्धा वाचा

मग पिझ्झा हेच ठरले जीवन

मित्रांसोबत पिझ्झा खातांना त्यांना हा व्यवसाय करण्याचे स्वप्न पडू लागली. पण आता वडिलांनी बीटेकसाठी लाखो रुपये, हार्डवेअर दुकानासाठी लाखो रुपये खर्च केल्याने, त्यांच्याकडे पैसे मागता येईना. अलवर येथे पिझ्झा कसा तयार करावा याचे प्रशिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च होता. या कठिण प्रसंगात त्यांची आई पाठिशी उभी राहिली. तिने गाठिशी असलेला पैसा दिला.

स्वप्नासाठी भावाने केली मदत

पिझ्झा कोर्स पूर्ण झाल्यावर गोहाना येथेच पहिले शॉप सुरु करण्याचे ठरले. त्यासाठी 7 लाख रुपयांची गरज होती. त्यावेळी त्यांचा भाऊ धावून आला. त्याने 3 लाख रुपये दिले. उर्वरीत रक्कम मित्रांनी दिली. या दुकानाचे नाव ठेवले पिझ्झा गॅलेरिया. त्यांची ही आयडिया कामाला आली. फ्रेश पिझ्झाने गर्दी झाली. वडिलांना मुलावर विश्वास वाढला. पण मुलाची प्रगती त्यांचे वडील पाहू शकले नाहीत. त्यांचे निधन झाले. त्यानंतर संदिप यांनी 2019 पर्यंत दहा स्टोअरचा आकडा गाठला.

अशी झाली प्रगती

  • पिझ्झा गॅलेरियाचे नेटवर्थ आज 50 कोटी रुपये
  • आज या समूहाने 250-300 जणांना दिला रोजगार
  • आज या कंपनीचे 32 स्टोअर्स आहेत. त्यातील 18 स्वतःच्या मालकीचे आहेत
  • तर चार फोको मॉडेल आणि इतर सर्व स्टोअर या फ्रँचाईज आहेत
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.