Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरु राहणार बँक! सुट्टीची चिंता नको, कधीही उरका बँकेची कामं

Bank for 24 Hours: जनधन बँक अकाऊंटनतर आता चोविस तास लोकांना बँकिंग सेवांचा लाभ घेता येऊ शकेल. अर्थसंकल्पात 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँक युनिट्स अर्थात DBU उघडण्याची घोषणा करण्यात आली होती.

24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरु राहणार बँक! सुट्टीची चिंता नको, कधीही उरका बँकेची कामं
कामाची बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 2:50 PM

नवी दिल्ली : बँक एका विशिष्ट आणि ठराविक  वेळेतच (Bank Timings) सुरु असतात. सध्यातरी असंच आहे. पण लवकरच बँका आठवड्याचे सातही दिवस आणि चोवीस तास सुरु राहणार आहेत. त्याअनुशंगानं आता आरबीयानं (RBI) पावलं टाकायलाही सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात (Centre Budget 2022) बँकांच्या 24 तास आणि सातही दिवसांच्या कामाचा मुद्दा नमूद करण्यात आला होता. त्यानंतर आता आरबीआयकडून या धर्तीवर बँका सुरु करण्यासाठी पुढील पावलं उचलली जात आहेत. जनधन बँक अकाऊंटनतर आता चोविस तास लोकांना बँकिंग सेवांचा लाभ घेता येऊ शकेल. अर्थसंकल्पात 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँक युनिट्स अर्थात DBU उघडण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता या DBU साठी गाईडलाईन्सही जारी करण्यात आल्या आहेत.

आरबीआयनं जारी केलेल्या गाईडलाईन्स देशातील सर्व व्यावसायिक बँकांनाही लागू असणार आहेत. यात ग्रामीण बँक, पेमेन्ट्स बँख आणि लोकल बँकांना वगळण्यात आलंय. डिजिटल बँकिंग युनिट्स नेमकं आहे काय आणि त्याचा नेमका फायदा कुणाला होणार आहे, हे समजून घेऊयात…

डिजिटल बँकिंग युनिट्स नेमकं असणार काय?

DBU म्हणजेच डिजिटल बँकिंग युनिट्स! गेल्या काळात ATM शब्द आणि त्याची सेवा जशी सर्वसामान्यांमध्ये रुजली, त्याचप्रमाणे येत्या काळात DBU ही प्रचलित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच धर्तीवर आता प्रयत्न सुरु कऱण्यात आले आहे. आरबीआयनं डीबीयूबाबत आपल्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. डीबीयू नेमक्या कशा असतील? त्या सर्वसामान्य बँकेसारख्या असतील की वेगळ्या असतील? याबाबत आता लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

डिझाईन आणि फॉरमॅटचा विचार करता डीबीयू हे सामान्य बँकेसारखे नसतील. त्याचं डिझाईन हे विशिष्ट प्रकारचं असते. तिथं प्रामुख्यानं डिजिटल बँकिंग युजर्ससाठीच्या सेवांचा लाभ मिळेल, असं सांगितलं जातंय.

या गोष्टी असतील डीबीयूमध्ये!

डीजीटल बँकिंग युनिट्समध्ये नेमकं काय काय असेल याची माहिती आरबीआयनं आपल्या गाईडलाईन्समध्ये जारी केली आहे. खालील गोष्टी डीबीयूमध्ये असतील. ज्यांचा वापर ग्राहकांना आपल्या दैनंदिन बँक व्यवहारांसाठी करता येऊ शकेल.

  1. इंटरएक्टीव टेलर मशिन
  2. इंटरएक्टीव बँकर
  3. सर्विस टर्मिनल
  4. टेलर
  5. कॅश रिसाईकलर्स इंटरएक्टीव डिजिटल वॉच
  6. डॉक्युमेन्ट अपलोडिंग
  7. सेल्फ सर्विस कार्ड
  8. व्हिडीओ केव्हायसी

तुम्हीच तुमचं खात उघडा!

डिजिटल बँकिंग युनिट्समध्ये ग्राहक स्वतःच स्वतःचं खातंही उघडू शकणार आहे. तसंच बँकिंगशी संबंधित सर्व कामं ग्राहक स्वतःच करु शकतील. सेल्फ सर्विससोबत या डीबियूमध्ये कर्मचारीही असतील. ग्राहकांना एखादी गोष्ट कळली नाही, तर त्यांना ती समजावून सांगण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कर्मचारीही या डीबीयूमध्ये असतील. आगामी काळाता आता अशाप्रकारच्या बँकिंग सेवांसाठी लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Gold Silver Rates Today: सोन्याचे दर 52 हजारच्या पार! तर चांदीही महागली, नेमके आजचे दर काय?

Face Check | व्यवहारापूर्वी एटीएमवर दोनदा Cancel बटण दाबा, पिन चोरीचे टेन्शन नाही, दावा खरा?

पेट्रोल डिझेलच्या दरात सामान्यांना दिलासा; जाणून घ्या आजचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील दर

पाहा VIDEO : महाराष्ट्रातली महत्त्वाची बातमी

कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.