Digital Labour Chowk : भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांची भटकंती थांबली; देशातील मजुरांचा ऑनलाईन चौक; रोजंदारी कामगारांसाठी भारतातील पहिले जॉब पोर्टल
Online Labour chowk : 'भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली', कामगारांच्या जिंदगाणीला शब्दांचा साज चढवणारे प्रख्यात कवी नारायण सुर्वे यांनी कामगारांच्या सुगंधी जखमा आपल्यासमोर आणल्या. काळानुरुप अनेक बदल झाले, आता मजुरांसाठी भारतातील पहिले जॉब पोर्टल सुरू झाले.

‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले, हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली.’ कविवर्य नारायण सुर्वे यांनी कामगारांच्या सुंगधी जखमा अशा समोर आणल्या. कामगार, मजूर, शेतमजूर या कष्टकरी जमातीच्या खडतर आयुष्यात आता आशेचा एक किरण उगवला आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यात नव उमेद मिळाली आहे. देशातील रोजंदारी कामगारांसाठी भारतातील पहिले जॉब पोर्टल सुरू झाले आहे. तंत्रज्ञानाचा शिरकाव आता या क्षेत्रात पण झाला आहे. मिळकत तर वाढलीच आहे, तर कामगारांना हक्काची, श्रमाच्या मोबदल्याची जाणीव होत आहे, हे ही नसे थोडके. ...