Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digital Rupee : खूषखबर, आता तुमच्याकडेही लवकरच ई-रुपया, या महिन्यात मिळणार डिजिटल चलन..

Digital Rupee : डिजिटल रुपया तुमच्याकडे कधी येणार?

Digital Rupee : खूषखबर, आता तुमच्याकडेही लवकरच ई-रुपया, या महिन्यात मिळणार डिजिटल चलन..
सर्वसामान्यांकडे लवकरच ई-रुपयाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 7:27 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakti Kant Das) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, सर्वसामान्यांसाठीही Digital Rupee लवकरच सुरु करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना त्याचा रोजच्या व्यवहारात वापर करता येणार आहे. त्यामुळे त्यांना पैसा खिशात बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.

लोकांची ई-चलनाची प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प पूर्णत्वास येत होता. 1 नोव्हेंबर रोजी आरबीआयने देशातील काही निवडक बँकांसाठी पायलट स्वरुपात हा डिजिटल रुपयाचा प्रकल्प सुरु केला.

सर्वसामान्यांसाठी ई-रुपया (E-Rupee) याच महिन्यात, नोव्हेंबरमध्ये सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दास यांनी दिली. त्यामुळे सर्वसामान्यांना आता ई-रुपयातून व्यवहार करता येणार आहे. त्यासाठीची प्रतिक्षा याच महिन्यात संपणार आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्याच दिवशी डिजिटल रुपयाच्या माध्यमातून एकूण 275 कोटींचे 48 व्यवहार पूर्ण झाले. भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा बँकेने ही या पायलट प्रकल्पात सहभाग घेतला. चलनाचे इलेक्ट्रॉनिक्स रुप म्हणजे डिजिटल करन्सी आहे. डिजिटल मनी, इलेक्ट्रॉनिक मनी, इलेक्ट्रॉनिक करन्सी, सायबर कॅश असे या चलनानाला नावे आहेत.

RBI गव्हर्नर यांच्या मते, डिजिटल रुपयाला सध्या केवळ 9 बँकांसाठी सुरु करण्यात आले. आता सर्वसामान्यांही लवकरच ई-रुपयातून व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. डिजिटल रुपया उपलब्ध करुन देताना पारदर्शकतेला महत्व देण्यात येणार आहे. देशभरात लवकरच ई-रुपयाचा वापर वाढणार आहे.

महागाई दिवसागणिक वाढत आहे. तेव्हा रिझर्व्ह बँक ही त्याच्याशी सामना करण्यासाठी धोरण आणि रणनितीत बदल करत आहे. त्यासाठी डिजिटल चलन हे महत्वाची भूमिका बजावू शकते असे केंद्रीय बँकेला वाटते.

सर्वसामान्य ग्राहकांना ई-रुपया उपलब्ध करुन देण्यापूर्वी त्यातील उणीवांची तपासणी करण्यात येणार आहे. सर्वच बाजूंनी पडताळा घेतल्यानंतर ई-चलन या महिन्यात ग्राहकांच्या हाती देण्याची तयारी करण्यात येईल.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.