Mutual Fund : म्युच्युअल फंडात थेट करावी गुंतवणूक की नियमीत योजना येईल कामी, कशात मिळेल तगडा रिटर्न

Mutual Fund : नियमीत म्युच्युअल फंडापेक्षा थेट गुंतवणुकीला का देण्यात येते प्राधान्य..

Mutual Fund : म्युच्युअल फंडात थेट करावी गुंतवणूक की नियमीत योजना येईल कामी, कशात मिळेल तगडा रिटर्न
परतावा जोरदारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 7:37 PM

नवी दिल्ली : परंपरागत गुंतवणूक योजनांमध्ये (Investment Scheme) जोखीम नसल्यात जमा असते. पण परतावाही मर्यादित मिळतो. याउलट म्युच्युअल फंडातील (Mutual Funds) गुंतवणूक ही जोखीमयुक्त असली तरी यामधील परतावा डोळे दिपवणारा असतो. गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षा (Share Market) परतावा कमी मिळत असला तरी जोखीमही तितकी नसते. सध्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यातच नियमीत म्युच्युअल फंडपेक्षा डायरेक्ट म्युच्युअल फंडातील (Direct Mutual Fund) गुंतवणूक फायदेशीर मानण्यात येते.

डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक ही जोखीमयुक्त असते. गुंतवणूकदार या योजनेत स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीचा वापर करुन गुंतवणूक करतो. फायदा अधिक असल्याने त्याचे गणित आणि आराखडा तोच तयार करतो. त्यासाठी तो कोणत्याही ब्रोकरची, फर्मची मदत घेत नाही.

डायरेक्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकरा कोणत्याही एजंटची मदत घेत नाही. कारण तो त्याच्या मर्जीनुसार, पसंतीनुसार म्युच्युअल फंड निवडतो आणि गुंतवणूक करतो. त्याल एजंटला कमिशन द्यावे लागत नाही. रेग्युलर प्लॅनमध्ये एजंटची मदत घ्यावी लागते. त्यामुळे डायरेक्ट प्लॅनपेक्षा हा रेग्युलर पॅन महाग पडतो.

हे सुद्धा वाचा

AMC च्या संकेतस्थळावर तुम्हाला भेट दिल्यावर डायरेक्ट म्युच्युअल प्लॅनची सर्व माहिती मिळेल. याठिकाणी तुम्ही डायरेक्ट प्लॅन निवडू शकता. त्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करु शकता. RTA संकेतस्थळावरुन अथवा अन्य प्लॅटफॉर्मवरुन तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकता. ऑफलाईन पद्धतीनेही गुंतवणूक करता येते. संबंधित कार्यालयात त्यासाठी अर्ज भरुन द्यावा लागतो.

सध्याची तुमची नियमीत म्युच्युअल फंड योजना तुम्ही बदलवू शकता. या योजनेतून तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंडात उडी घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही नियमीत योजनेतून थेट म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करु शकता. याविषयीची माहिती पण संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी केवायसी अपडेट करणे अथवा केवायसी कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. प्रत्येक म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांना रेग्युलर आणि डायरेक्ट गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करुन देते. डायरेक्ट योजनेचा एनव्ही रेग्युलर योजनेपेक्षा नेहमी जास्त असतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.