Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : शेअर बाजाराला अखेरचा दंडवत! इतके लाख गुंतवणूकदार पडले बाहेर

Share Market : शेअर बाजारावर रुसवे फुगवे तर सुरुच असतात. कोरोना काळात आर्थिक परिस्थितीत बिकट असताना ही बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आले होते. पण हा करिष्मा फार काळ टिकला नाही. मोहभंग झाल्याने अनेकांनी आता माघारीचा रस्ता धरला आहे.

Share Market : शेअर बाजाराला अखेरचा दंडवत! इतके लाख गुंतवणूकदार पडले बाहेर
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 7:20 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारावर रुसवे फुगवे तर सुरुच असतात. कोरोना काळात आर्थिक परिस्थितीत बिकट असताना ही बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आले होते. पण हा करिष्मा फार काळ टिकला नाही. मोहभंग झाल्याने अनेकांनी आता माघारीचा रस्ता धरला आहे. नॅशल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) ताज्या आकड्यानुसार, लाखो गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटला (Stock Market) रामराम ठोकला आहे. यामागील कारणे समजून घेणे आवश्यक आहे. शेअर बाजारात येताच लागलीच कमाई होईल, हा भ्रम काही महिन्यातच तुटल्याने पण काहींनी शेअर बाजाराला अलविदा म्हटलं आहे. पण इतर कारणं तुम्हाला अचंबित करणारी असतील.

जागतिक घडामोडींचा परिणाम NSE च्या आकड्यानुसार गेल्या 9 महिन्यांत जवळपास 53 लाख गुंतवणूकदारांनी बाजारात काढता पाय घेतला आहे. यामध्ये जागतिक घडामोडींचा मोठा वाटा आहे. भूराजकीय घडामोडी, अमेरिका, युरोपातील वित्तीय आणि बँकिंग संकट, इंधनाचे चढे दर, सोने-चांदीतून मिळणारा मोठा परतावा, रेपो रेटमुळे वाढलेले व्याजदर यामुळे शेअर बाजारातून फार काही हाती येत नसल्याचा नवख्या गुंतवणूकदारांचा समज झाला आहे. त्यामुळे त्यांच्या दृढनिश्चियाला तडा गेला आहे.

काय सांगतात आकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, सक्रीय गुंतवणूकदारांची संख्या जवळपास 3.27 कोटी होती. जून 2022 मध्ये ही संख्या जवळपास 3.8 कोटी झाली. गेल्या 9 महिन्यात या आकडेवारीत अजून घसरण झाली. जवळपास 53 लाख गुंतवणूकदारांचा मोहभंग होऊन, त्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे.

हे सुद्धा वाचा

ही आहेत कारणं

किरकोळ गुंतवणूकदारांचा पैसा कमी आर्थिक वर्ष 2023 दरम्यान स्टॉक मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी पैसा ओतला नाही. NSE आकड्यांनुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये 49200 कोटी रुपयांचा रिटेल इनफ्लो होता. आर्थिक वर्ष 2021–22 आणि आर्थिक वर्ष 2020–21 च्या तुलनेत हा आकडा कमी आहे. म्हणजे गुंतवणूकदारांची संख्या वाढूनही बाजारात हवी तशी आवक आली नाही. म्हमजे हा गुंतवणूकदार तळ्याच्या काठावर बसलेला होता. त्याला सूर मारायचाच नव्हता.

वर्क फ्रॉम होम कल्चर बंद कोविड-19 मुळे देशभरात घरातून काम करण्याची सोय झाली. त्यामुळे बाजारात नवीन गुंतवणूकदारांनी झपाट्याने आगेकूच केली. अनेकांनी शेअर बाजारात धाव घेतली. त्यामुळे बाजारात अचानक चैतन्य आले. बाजार काही दिवसांतच फुलून गेला. त्यावेळी वर्क फॉर्म सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणावर सकाळच्या सत्रात गुंतवणूकदार बाजारात डोकावत होता. सध्या वर्क फ्रॉम होम कल्चरला ओहोटी लागली आहे.

दुसरे अनेक पर्याय गेल्या एक वर्षात बाजारात गुंतवणूकदारांना सोने-चांदी, एफडी आणि इतर साधनातून मोठ्या प्रमाणात परतावा मिळत आहे. एफडीवरील व्याज वाढून आता 6.8 टक्क्यांवर पोहचले आहे. त्यातूनही हमखास आणि जोखीम मुक्त परतावा मिळत आहे. त्यामुळे कॅलक्युलेटेड रिस्क घेण्यापेक्षा सहज परतावा मिळण्याकडे अनेकांचा ओढा आहे.

डीमॅट खाते झाले कमी स्टॉक मार्केटमध्ये उडी घेण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार डीमॅट खाते उघडून बाजारात दाखल झाले होते. पण आता डीमॅट खाते उघडणाऱ्यांची संख्या 8% पर्यंत घसरली आहे.

'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक.