Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 शेअरवर लागली 27 रुपयांची लॉटरी! Tata ची ही कंपनी करणार मालामाल

Tata Group Dividend | टाटा समूहातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. टीसीएसच्या जोरदार घौडदौडीचा फायदा त्यांना मिळाला आहे. कंपनीने एका शेअरवर 27 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. आज 19 जानेवारी 2024 ही तारीख रेकॉर्ड डेट आहे. यापूर्वी पण कंपनीने लाभांश जाहीर केला होता.

1 शेअरवर लागली 27 रुपयांची लॉटरी! Tata ची ही कंपनी करणार मालामाल
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 10:39 AM

नवी दिल्ली | 19 जानेवारी 2024 : टाटा समूहातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड (TCS Dividend) आज शेअर बाजारात एक्स-डिव्हिडेंड ट्रेड करणार आहे. एका शेअरवर 27 रुपये लाभांश देण्याची घोषणा कंपनीने केली होती. ही 72 वी वेळ आहे, जेव्हा कंपनी बाजारात एक्स-डिव्हिडेंड ट्रेड करेल. गुरुवारी कंपनीचा शेअर बीएसईवर 0.50 टक्के तेजीसह 3903.50 रुपयांवर बंद झाला होता. तर आज सकाळी कंपनीचा शेअर 0.68 टक्क्यांच्या तेजीसह ट्रेड करत होता. कंपनीने लाभांश देण्याची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला. ज्यांनी हा शेअर अगोदरच घेऊन ठेवला आहे. ते मालामाल झाले आहेत.

TCS ची एक्स डिव्हिडंट डेट आज

टीसीएसने 11 जानेवारी रोजी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान लाभांश देण्याची घोषणा केली होती. कंपनीने तेव्हा 9 रुपयांचा अंतरिम लाभांश आणि 18 रुपयांचा खास डिव्हिडंड मिळून एकूण 27 रुपयांचा लाभांश देण्यात येईल. कंपनीने त्यासाठी आज 19 जानेवारी 2024 ही तारीख रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. 5 फेब्रुवारी 2024 रोजी पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांशाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. टाटा समूहातील या दिग्गज कंपनीने पहिल्यांदा 2007 मध्ये लाभांश जाहीर केला होता. टीसीएसच्या वतीने 2009 आणि 2018 मध्ये बोनस देण्यात आला होता. दोन्ही वेळा कंपनीने 1 शेअरवर 1 शेअर बोनस दिला होता.

हे सुद्धा वाचा

शेअर बाजारात कसे प्रदर्शन

गेल्या सहा महिन्यात शेअर बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर एका वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आतापर्यंत 15 टक्क्यांचा फायदा झाला आहे. कंपनीने 52 आठवड्यात 3965 रुपयांची उच्चांकी झेप घेतली. तर 52 आठवड्यातील निच्चांक 3070 राहिला आहे.

जगातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी

टीसीएस, जगातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी ठरली आहे. कोरोना महामारीत 3 एप्रिल 2020 रोजी टीसीएसच्या शेअरने 1654 अशी निच्चांकी पातळी गाठली होती. गुंतवणूकदारांचे भांडवल 150 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत एआयमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. त्यांतर ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी ठरली आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.