Dividend Share : काय सांगता काय, 1 शेअरला 33 रुपयांचा लाभांश! कोणती आहे ही PSU कंपनी

Dividend Share : या शेअरने अनेक दिग्गजांना धोबीपछाड दिली आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे. ज्यांच्याकडे या कंपनीचे जास्त शेअर आहेत. त्यांना तर मोठा फायदा होणार आहे. एका शेअरवर ही कंपनी 33 रुपयांचा लाभांश देणार आहे.

Dividend Share : काय सांगता काय, 1 शेअरला 33 रुपयांचा लाभांश! कोणती आहे ही PSU कंपनी
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 6:57 PM

नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : सरकारची मालकी असणाऱ्या या कंपनीने बाजारातील दिग्गजांपेक्षा पराक्रम केला. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (Public Sector Undertaking) असलेल्या या कंपनीने 1 शेअरला 33 रुपयांचा लाभांश (Dividend) देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना एकदम लॉटरी लागली. ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे जास्त शेअर आहेत. त्यांना तर मोठा फायदा झाला. एका शेअरवर 33 रुपये मिळणार असल्याने गुंतवणूकदारांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होईल. या शेअरची, बाजारात (Share Market) पण चांगली कामगिरी बजावली आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेट, तारीख पण निश्चित करण्यात आली आहे. या शेअरचा भावा शुक्रवारी 475.85 रुपयांच्या स्तरावर बंद झाला आहे. सध्या हा स्टॉक सुस्तावलेला आहे. पण डिव्हिडंडच्या वृत्ताने गुंतवणूकदारांना सत्तर हत्तीचे बळ मिळाले आहे.

कशी आहे कंपनीची कामगिरी

Balmer Lawrie Investment असे या कंपनीचे नाव आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये 1.10 टक्के तेजी आली . हा शेअर 475.85 रुपयांवर पोहचला. एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने चांगली कामगिरी बजावली आहे. या शेअरमध्ये 12 टक्क्यांची उसळी आली आहे. एका शेअरमागे मोठा लाभांश मिळणार असल्याच्या वृत्ताने हा शेअर तेजीत आला आहे. आतापर्यंत हा स्टॉक सुस्तावलेला होता. बालमेर लॉरी इन्व्हेसमेंट ही कंपनी पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येते. जून मधील आकडेवारीनुसार, या कंपनीत सरकारची एकूण हिस्सेदारी 59.67 टक्के इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

एका शेअरवर 33 रुपयांचा डिव्हिडंड

या कंपनीने गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. प्रत्येक शेअरवर ही कंपनी 33 रुपयांचा लाभांश देणार आहे. डिव्हिडंडसाठी कंपनीने रेकॉर्ड डेट पण ठरवली आहे. याच महिन्यात लाभांश देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत ही कंपनी शेअर बाजारात एक्स डिव्हिडेंड स्टॉक म्हणून ट्रेडिंग करेल.

काय आहे तारीख

Balmer Lawrie Investment नुसार, 10 रुपयांच्या फेसवॅल्यूच्या एका शेअरवर 330 रुपयांचा लाभांश देण्यात येईल. कंपनीने त्यासाठी 20 सप्टेंबर 2023 ही तारीख निश्चित केली आहे. ज्या गुंतवणूकदारांचे नाव या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना लाभांशाचा लाभ देण्यात येईल. Balmer Lawrie Investment ची वार्षिक सर्वसाधारण बैठक 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. 30 दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांशाची रक्कम जमा होईल.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.