Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : दिवाळीत धन धना धन; मुकेश अंबानी यांच्या कंपनीची जोरदार ऑफर, घर बसल्या केवळ 10 रुपयांत खरेदी करा सोनं

Jio Finance Smart Gold offer : या धनत्रयोदशीला (Danteras 2024) घर बसल्या सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक जबरदस्त पर्याय समोर आला आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने या दिवाळीत ही धमाकेदार ऑफर आणली आहे. त्यानुसार ग्राहकांना अवघ्या 10 रुपयांत सुद्धा सोन्याची खरेदी करता येणार आहे.

Mukesh Ambani : दिवाळीत धन धना धन; मुकेश अंबानी यांच्या कंपनीची जोरदार ऑफर, घर बसल्या केवळ 10 रुपयांत खरेदी करा सोनं
मुकेश अंबानी यांची धमाकेदार ऑफर
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 12:11 PM

आज देशभरात धनत्रयोदशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. सराफा बाजारात सणासुदीलाच सोने आणि चांदीचा भाव घसरल्याने ग्राहकांचा उत्साह दिसून येत आहे. बेशकिंमती धातुंचे दर तसे चढेच आहेत, तरीही मागणीत कमी आलेली नाही. काही कंपन्या ग्राहकांना घरबसल्या सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय देत आहेत. यामध्ये मुकेश अंबानी यांची जिओ फायनान्स ही कंपनी पण मागे नाहीत. सध्या युपीआय प्लॅटफॉर्मपासून ते ॲप्सपर्यंत सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. त्यात Jio Finance केवळ 10 रुपयांमध्ये डिजिटल गोल्ड खरेदीचा (Digital Gold) पर्याय देते.

मुकेश अंबानी यांच्या कंपनीची धमाकेदार ऑफर

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची कंपनी Jio Finance ने स्मार्ट गोल्ड योजना लाँच केल आहे. यामध्ये ग्राहकांना केवळ 10 रुपयांत डिजिटल गोल्ड खरेदीची संधी आहे. अंबानी यांची कंपनीने दिवाळीच्या सुरुवातीलाच धनत्रयोदशीला या धमाकेदार योजनेची सुरूवात केली आहे. डिजिटल गोल्डसाठी ग्राहकांसाठी कंपनीने खास ऑफर आणली आहे.

हे सुद्धा वाचा

या सोन्याच्या गुंतवणुकीत ग्राहक त्याच्याकडील स्मार्ट गोल्ड युनिट कोणत्याही वेळी, रोख रक्कमेत, सोन्याच्या शिक्क्यात वा सोन्याच्या आभूषण, दाग-दागिन्यात बदलवू शकतो. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांना या योजनेत हजारो वा लाखो रुपये गुंतवणुकीची गरज नाही. केवळ 10 रुपयांत ग्राहक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

चोरीची कोणतीही भीती नाही

स्मार्टगोल्ड योजनेत सोनं चोरी होण्याची कोणतीही भीती नसते. डिजिटल गोल्ड जवळ बाळगण्याची गरज नाही. ते हरवण्याची भीती नाही. तसेच ते लॉकरमध्ये ठेऊन, त्यापोटी बँकेला पैसे मोजण्याची गरज नाही. चोरी होण्याची भीती नाही, हा एक मोठा फायदा आहे. तुम्ही खरेदी केलेले सोने हे 24 कॅरेट असते. ते इंश्योर्ड वॉल्टमध्ये ठेवण्यात येते. बाजारातील त्यावेळेच्या किंमतीनुसार त्याची विक्री करता येते.

सोन्यात गुंतवणुकीचे दोन पर्याय

Jio Finance App वर स्मार्टगोल्ड योजेत सोन्यात गुंतवणुकीसाठी कंपनीकडून ग्राहकांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्ही गुंतवणुकीची रक्कम निश्चित करून सोने खरेदी करू शकता. पण फिजिकल गोल्डची डिलिव्हरी केवळ 0.5 ग्रॅम अथवा त्यापेक्षा अधिक गुंतवणुकीवरच करण्यात येणार आहे. 0.5 ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम मूल्यवर्गात सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. ग्राहक जिओ फायनान्स अॅप्सवर थेट सोन्याचे शिक्के खरेदी करून होम डिलिव्हरीची सुविधा मिळवू शकतात.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.