Electricity | अंधारात साजरी करावी लागेल का देशवासियांना दिवाळी? कोळशाच्या कमतरतेमुळे सणांच्या आनंदावर पडणार का विरजण?

Electricity | आगामी दोन महिने देशात सणासुदीचे आहेत. दसऱ्यानंतर दिवाळी हा मोठा सण येणार आहे. अशातच देशात कोळशाची कमतरता आहे. सणांच्या काळात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकारने काय उपाय योजना केली ते पाहुयात..

Electricity | अंधारात साजरी करावी लागेल का देशवासियांना दिवाळी? कोळशाच्या कमतरतेमुळे सणांच्या आनंदावर पडणार का विरजण?
सणासुदीत वीजेचा तुटवडा नाहीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 1:34 PM

नवी दिल्ली : आगामी दोन महिने देशात सणासुदीचे (Festival Seasons) आहेत. दसऱ्यानंतर दिवाळी (Diwali) हा मोठा सण येणार आहे. अशातच देशात कोळशाची (Coal Crisis) कमतरता आहे. सणांच्या काळात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकारने काय उपाय योजना केली ते पाहुयात..

देशातील वीज निर्मिती केंद्रावर कोळशाची कमतरता आहे. तीन महिन्यांपूर्वी कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. कोळशाची वेळेत पुर्तता न झाल्याने विद्युत निर्मिती केंद्र बंद पडले होते.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये यामुळे तणाव वाढला होता. कोळशाच्या पुरवठा वेळेत न झाल्याने राजस्थान, दिल्लीसहित मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये अनेक तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

हे सुद्धा वाचा

या परिस्थितीपासून धडा घेत, केंद्र सरकारने कोळसा संकटावर मात करण्यासाठी जबरदस्त प्लॅन तयार केला होता. ऐन सणासुदीत पुन्हा कोळशाचा तुटवडा होऊ नये यासाठी केंद्राने अगोदरच कंबर कसली होती.

आता सणासुदीत बित्तगूल होण्याची शक्यता मावळली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत 2 कोटी टन कोळश्याची आयात (Coal Import) केली आहे. बाहेरील देशातून हा कोळसा आणण्यात आला आहे.

विद्युत आणि ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी याविषयीची माहिती दिली. कोळशाचा तुटवडा पाहता सरकारने अगोदरच कोळसा आयात करण्याचा निर्णय घेतला होता.

‘इनसाइट 2022’ या कार्यक्रमात त्यांनी कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकटाचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती दिली. वेळीच कोळशाची आयात करण्याचा निर्णय फायदेशीर ठरला

सध्या देशात दोन कोटी टन कोळशाची आयात करण्यात आली आहे. त्यातील 1.5 कोटी टन कोळशाचा वापर करण्यात आला आहे. तर उर्वरीत स्टॉक हा सणासुदीत वाढलेल्या वीज मागणीची पूर्ततेसाठी वापरण्यात येईल.

गरज पडली तर सरकार आणखी कोळसा आयात करणार असल्याचे सचिव आलोक कुमार यांनी सांगितले. देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असून त्यांना मुबलक वीज पुरवठा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.