सावधान! तुमचंही अनेक बँकेत खातं आहे का ?, गरज नसलेली खाती वेळीच बंद करा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

तुमची जर चार बँक खाते असतील तर मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवणे ही मोठी समस्या असते. प्रत्येक बँकेत कमीत कमी 10 हजार रुपये ठेवण

सावधान! तुमचंही अनेक बँकेत खातं आहे का ?, गरज नसलेली खाती वेळीच बंद करा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
कामाची बातमीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 12:19 PM

मुंबईत राहणाऱ्या शुभम देसाईने आतापर्यंत 12 नोकऱ्या बदलल्या. प्रत्येक कंपनीमध्ये नवीन बँक खाते सुरू केल्याने त्याची आता अनेक बँक खाती सुरू आहेत. आयटीआर (ITR) भरण्याच्या वेळी सीएने (CA) ने सर्व खात्यांचा (Account) तपशील मागीतल्याने शुभमचा गोंधळ उडाला. अनेक खात्यांमध्ये किमान रक्कम नसल्यानं त्याने आतापर्यंत खूप पैसा गमावला आहे.जे लोक नोकरी किंवा नोकरीच्या निमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात अशावेळी अनेक बँक खाती सुरू केली जातात.ही खाती नंतर सांभाळली जात नाहीत.तुमची देखील गरजेपेक्षा अनेक खाती असतील तर ती त्वरीत बंद करा. असे न केल्यास पैशाचे नुकसान होईलच पण त्यासोबत अनेक समस्यांनादेखील सामोरे जावे लागेल.

सामान्यपणे सलग तीन महीने खात्यात पगार न आल्यास बँक सॅलरी अकाऊंटला बचत खात्यात ट्रान्सफर करते. शुभमने ज्या- ज्या बँकांमध्ये सॅलरी अकाऊंट सुरू केलं होतं ती सर्व खाती आता बचत खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता बँकेकडून खात्यांवर विविध प्रकारचे शुल्क लावले जात आहे. तसेच सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्स न ठेवल्यास त्रैमासिक दंड सुद्धा लावला जात आहे.याचबरोबर खात्यात पैसे नसतील तरीदेखील दंड आकारला जात आहे.

मिनिमम बॅलन्सची समस्या

उदाहरणार्थ तुमची जर चार बँक खाते असतील तर मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवणे ही मोठी समस्या असते. प्रत्येक बँकेत कमीत कमी 10 हजार रुपये ठेवण्याची मर्यादा आहे. म्हणजेच एकूण 40 हजार रुपये अडकून राहणार. खात्यात किमान बँलेन्स नसल्यास दंड भरावा लागतो. मिनीमम बॅलन्स न ठेवल्यास बँकेने आता शुल्क वाढवले आहे. म्हणजेच त्रैमासिकाच्या आधारावर 750 रुपयांचे शुल्क वसूल करण्यात येते. या शुल्कावर 18 टक्के GST लागतो. एकूणच वर्षभरात तुमच्या खात्यातून 3640 रुपये शुल्क म्हणून कपात करण्यात येतात.

हे सुद्धा वाचा

बँकेत खाते सुरू केल्यानंतर तुम्हाला डेबिट कार्ड दिले जाते. यावर 100 ते 200 रुपये शुल्क आणि GST आकरण्यात येतो. जर तुमच्या बँक खात्यात पैसे नसतील तर शुल्क व्याजासहित वसूल करण्यात येते. आजकाल सर्वच बँका SMS च्या स्वरुपात शुल्क आकारत आहेत. काही बँका या नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या वापरावर शुल्क लावतात. तुमच्या बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात चेकच्या माध्यमातून व्यवहार होत असतील तर शुल्क लागते.याचप्रमाणे ठराविक मर्यादेपेक्षा एटीएममधून जास्त पैसै काढल्यास दंड आकारला जातो.

आयकर रिटर्न भरताना अडचण

आयकर रिटर्न भरताना करदात्याला सर्व बँकांचा IFSC कोड आणि अर्जित व्याजाच्या उत्पन्नाचा तपशिल देणे बंधनकारक असते. एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट असल्यास ITR भरण्यास समस्या येऊ शकते. वेगवेगळ्या बँकांतील बॅलन्स आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेला रिटर्नमध्ये दाखवणे अनिवार्य असते. यासाठी सर्व बँकांचे स्टेटमेंट आवश्यक असते. जर तुमचे खाते नियमित स्वरूपात सुरू नसेल तर बँक स्टेटमेंट काढताना अडचणी येतात.

या सर्व समस्यांपासून वाचण्यासाठी नवीन बँक खाते सुरू करण्याआधी जुन्या खात्याची गरज आहे का हे पहावे. गरज नसल्यास बंद करावे. ज्या खात्यांमध्ये व्यवहार कमी आहेत अशा खात्यांचा गैरवापर होऊ शकतो. ज्या खात्यात रक्कम जास्त असते अशा खात्यांवर हॅकर्सची नजर असते. असे बँकिंग तज्ज्ञ आणि माजी अधिकारी K.B. सिंग यांनी सांगितलं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.