Top Investros : ही आहेत शेअर बाजारातील ‘बाप’ माणसं! हर्षद मेहता याच्या काळापासून छापतायेत नोटा
Top Investors : शेअर बाजारातून कमाईचा डोंगर उभे करणारे अनेक दिग्गज भारतात आहेत. बिग बुल आहे. त्यांचे गुरु आहेत. शेअर बाजारातून बक्कळ कमाई करणाऱ्या नामचीन लोकांमध्ये यांचा समावेश आहे. तुम्हाला ही शेअर बाजाराचा मंत्र जपण्यासाठी यांचा कित्ता गिरवावा लागेल.
नवी दिल्ली : शेअर बाजारातून (Share Market) कमाईचा डोंगर उभे करणारे अनेक दिग्गज भारतात आहेत. बिग बुल आहे. त्यांचे गुरु आहेत. शेअर बाजारातून बक्कळ कमाई करणाऱ्या नामचीन लोकांमध्ये यांचा समावेश आहे. भारतीय शेअर बाजारातील बिग बुल म्हटलं की आपल्यापुढे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे नाव चटकन येते. आज ते आपल्यात नाहीत. पण त्यांच्या पोर्टफोलिओला लाखो गुंतवणूकदार आजही फॉलो करतात. त्यांच्या पत्नीने त्यांच्यानंतर कमान संभाळली आहे. परंतु असे नाही की, शेअर बाजार केवळ झुनझुनावाला कुटुंबियांवर मेहरबान झाले आहे, अनेक दिग्गज शेअर बाजारात (Top Investors) आहेत. तुम्हाला ही शेअर बाजाराचा मंत्र जपण्यासाठी यांचा कित्ता गिरवावा लागेल .
भारतीय शेअर बाजारात दिग्गज गुंतवणूकदारांमध्ये आणि कमाईदारांमध्ये आज ही पहिले नाव राकेश झुनझुनावाला यांचेच आहे. वॉरेन बफे यांच्या नावाने, त्यांना भारतीय गुंतवणूकदार भारताचा वॉरेन बफे अथवा बिग बुल या नावाने ओळखतात. राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 2022 पर्यंत 31,833 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. 14 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे भारतीय शेअर बाजार आणि त्यांना फॉलो करणाऱ्यांचा मोठा आधार गेला.
या यादीत दुसरे नाव आहे. डीमार्टचे मालक राधाकिशन दमानी यांचे. त्यांना शेअर बाजारातील सर्वात मोठा गुंतवणूकदार मानल्या जाते. राकेश झुनझुनवाला दमानी यांना आपले गुरु मानत. 80-90 च्या दशकापासून शेअर बाजारात ते प्रचंड सक्रिय आहेत. दमानी यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओची साईज 1,61,356 कोटी रुपये आहे. ते ब्राईट स्टार इन्व्हेसमेंट्स लिमिटेड नावाने फर्म चालवतात.
राधाकिशन दमानी यांच्या नंतर रमेश दमानी हे शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात. शेअर बाजारात त्यांनी 1990 पासून गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. त्यावेळी निर्देशांक अवघा 600 पॉईंट्सवर होता. दमानी यांनी मुंबईतील एचआर कॉलेजमधून पदवी मिळवली. कॅलिफॉर्नियातील स्टेट विद्यापीठातून त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. रमेश दमानी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ते व्यापार करतात.
रामदेव अग्रवाल हे पण भारतीय शेअर बाजारातील चर्चेतील नाव आहे. सामान्य गुंतवणूकदार म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली. आज त्यांची कोट्यवधींची कमाई आहे. 1987 मध्ये त्यांनी मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मची सुरुवात केली होती. 1995 मध्ये त्यांनी हिरो होंडाचा शेअर 30 रुपयांप्रमाणे खरेदी केला होता. त्यावेळी त्यांनी 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. आज या स्टॉकची किंमत 2336 रुपये आहे.
विजय केडिया हे नाव सध्या खूप चर्चेत आणि लोकप्रिय आहे. त्यांनी 19 व्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणुकीला सुरुवात केली होती. केडिया यांच्या रणनीतीला SMILE या नावाने ओळखल्या जाते. बाजारातील सखोल अभ्यास आणि नियमांना धरून गुंतवणुकीला ते प्राधान्य देतात. फायद्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक आणि सहनशीलता यावर ते भर देतात.
नेमिष शाह हे शेअर बाजारातील चांगल्या गुंतवणूकदारांपैकी एक मानण्यात येतात. वॉरेन बफे यांच्या प्रमाणेच ते रणनीतीचे पालन करतात. ते ENAM चे सह संस्थापक आहेत. या ब्रोकरेज युनिटची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली होती. आयपीओमधील गुंतवणुकीत या संस्थेने महत्वपूर्ण भूमिका निभावली.