Rupee : 22 वर्षांत किती पडला रुपया? एका क्लिकवर जाणून घ्या माहिती..

Rupee : 22 वर्षांत रुपयाची घसरगुंडी कशी उडाली ते पाहुयात..

Rupee : 22 वर्षांत किती पडला रुपया? एका क्लिकवर जाणून घ्या माहिती..
रुपयाच्या घसरणीचा इतिहास जाणून घ्या..Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 8:09 PM

नवी दिल्ली : डॉलरच्या (Dollar) तुलनेत भारतीय रुपयाने (Rupee) पुन्हा एकदा आपटली खाली आहे. शुक्रवारी भारतीय रुपया आठ पैशांनी घसरत (Fall Down) 82.32 रुपये प्रति डॉलरवर पोहचला. यापूर्वी तो गुरुवारी 82.24 रुपयावर बंद झाला होता.

एकीकडे डॉलर रुपयापेक्षा मजबूत होत असताना, केंद्रीय अर्थंमंत्री निर्मला सीतारमण यांनी अजबच दावा केला. अर्थमंत्र्यांनी रुपयाची घसरण होत नसून, डॉलर मजबूत स्थिती होत असल्याचा दावा त्यांनी केला. तर इतर देशांच्या चलनापेक्षा भारतीय रुपया तगड्यास्थिती असल्याचा दावाही त्यांनी ठोकला.

यापूर्वी संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्रालयाने माहिती दिली होती. त्यानुसार, 2014 मध्ये केंद्र सरकारमध्ये भाजपची सत्ता आली. त्यावेळी डॉलरची किंमती रुपयाच्या तुलनेत 63.33 रुपये होती. तर त्यानंतर 31 डिसेंबर 2018 पर्यंत त्याच्यात घसरण सुरुच होती. तो घसरुन 69.79 रुपये प्रति डॉलरवर पोहचला.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर 2019 मध्येच रुपयाची घसरण 70 रुपयांपर्यंत पोहचली. म्हणजे एका डॉलरसाठी भारतीयांना 70 रुपये मोजावे लागत होते. पण रुपयाच्या घसरणीला सरकार दरबारी ब्रेक लावण्यात अपयश आले. कोरोना काळात तर परिस्थिती अधिक बिकट झाली.

कोरोना काळानंतर डॉलरसमोर भारतीय रुपयाने सपशेल लोटांगण घातले. 30 जून 2022 रोजी एका डॉलरची किंमत 78.94 रुपया झाली. तर 11 जुलै 2022 रोजी पुन्हा रुपयात घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 79.41 झाला.

ही घसरण वाढतच आहे. त्याला ब्रेक लावण्याचे सर्व उपाय योजना सपशेल फेल ठरत आहे. त्यामुळे आता हेडलाईन्स केवळ रेकॉर्डब्रेक पडझड, घसरण यावर अडकून पडल्या आहेत. घसरणीत रुपया दररोज एक विक्रम करत आहे. 16 ऑक्टोबर 2022 रोजीपर्यंत एक डॉलरची किंमत 82 रुपये 32 पैसे इतकी झाली आहे.

भारताच्या रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 82.32 रुपये झाली आहे. तर भारत शेजारील पाकिस्तानची स्थिती सर्वात वाईट आहे. एका डॉलरच्या तुलनेत 218.14 पाकिस्तानी रुपया अशी स्थिती आहे.

तर श्रीलंकन रुपयाची अवस्था त्याही पेक्षा बिकट झाली आहे. एका डॉलरच्या तुलनेत 365.11 रुपये श्रीलंकन रुपयाची अवस्था झाली आहे. चीनच्या चलनाची अवस्था याबाबतीत सर्वात चांगली आहे. एका डॉलरच्या तुलनेत 7.18 चीनी युआन रॅन्मिन्बी आहे.

एका डॉलरच्या तुलनेत 131.74 नेपाळी चलन आहे तर बांग्लादेशी रुपया 104.86 रुपये आहे. सर्वात वाईट अवस्था म्यानमार या शेजारील देशाची आहे. म्यानमारचे चलन सर्वात जास्त गडगडले आहे. एका डॉलरच्या तुलनेत 2,095.81 बर्मी क्यात्सो आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.