आता फक्त पैसा मोजायचा, ट्रम्प तात्या येताच बाजार बहरला; शेअर मार्केटमध्ये तुम्हाला झालाय का फायदा?

Share Market Booming : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी अंदाजाप्रमाणे बाजी मारली. त्यानंतर भारतीय शेअर बाजाराने झुंबा डान्स सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मंदीच्या फेऱ्यात अडकलेला बाजाराने तेजीची ट्रेन धरली. भारतीय आयटी कंपन्यांचे शेअर उसळले. शेअर बाजाराने पु्न्हा दमदार चाल दाखवली.

आता फक्त पैसा मोजायचा, ट्रम्प तात्या येताच बाजार बहरला; शेअर मार्केटमध्ये तुम्हाला झालाय का फायदा?
बाजाराला आले भरते
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 3:19 PM

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल आले आहेत. एकदा पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात राष्ट्राध्यक्ष पदाची माळ पडली आहरे. त्यांनी ड्रेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजाराला तेजीचे भरते आले आहे. स्टॉक मार्केटमध्ये सकाळपासून तेजीचे वारे वाहत होते. जस-जसे निवडणुकीचे निकाल हाती येत गेले आणि ट्रम्प तात्या यांच्या जिंकण्याची खात्री झाल्यावर बाजाराने मोठी उसळी घेतली. ट्रम्प यांची धोरणं ही जागतिक आणि कॉर्पोरेट जगतासाठी अनुकूल मानण्यात येत आहेत. त्याचा परिणाम बाजारावर लागलीच दिसून आला. स्वतः ट्रम्प हे बिझनेस टायकून आहेत. त्यांचा व्यापार हा अमेरिकेसह युरोप आणि आशिया खंडात पसरलेला आहे. भारतातही ट्रम्प यांची रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक आहे.

आयटी कंपन्यांनी धरला जोर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअरमध्ये उसळी दिसून आली. देशातील सर्व मोठ्या आयटी कंपन्यांचा व्यापार हा अमेरिकेत आहे. ट्रम्प यांच्या विजयामुळे TCS, Infosys, HCL, Tech, Wipro आणि Dixon Tech सारख्या शेअर बाजारात तुफान तेजी आली आहे. आज TCS 3.74 टक्के, HCL Tech 3.80 टक्के, इन्फोसिस 3.80 टक्के आणि विप्रो 3.20 टक्के अशी धाव या शेअरने घेतली.

हे सुद्धा वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची घोषणा होताच, दुपारी 2:20 वाजता बीएसई निर्देशांक 800 अंकांनी वधारला. BSE Sensex 80,250 अंकापुढे गेला. तर NSE Nifty मध्ये पण तेजी दिसून आली. निफ्टी आज 235 अंकांनी वधारून 24,450 अंकांपेक्षा पुढे सरकला. Emkay Global ने अंदाज वर्तवला आहे की, ट्रम्प यांच्या विजयामुळे शेअर बाजारात शॉर्ट टर्म रॅली दिसेल. गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होईल.

या क्षेत्रातील निर्देशांकांची दमदार कामगिरी

आज सुरुवातीच्या व्यापारात निफ्टीमध्ये , निफ्टी बँक ( 0.27 टक्के ), ऑटो ( 0.02 टक्के ), आयटी ( 0.79 टक्के ), मीडिया ( 0.22 टक्के ) आणि रियल्टी ( 1.55 टक्के ) मध्ये तेजीचे सत्र दिसले. मेटल ( -0.87 टक्के ) आणि एफएमसीजी ( -0.07 टक्के ) मध्ये घसरण दिसली. आता यापुढे पण बाजारात तेजीचे सत्र दिसण्याची शक्यता आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.