Silver : तर गुंतवणूकदारांची होणार चांदी, सोडू नका गुंतवणुकीची संधी

Silver : चांदीतील गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. येत्या काही काळात चांदी ग्राहकांची चांदी करु शकते. चांदीच्या किंमती सध्या घसणीवर आहे. पण येत्या काळात चांदीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Silver : तर गुंतवणूकदारांची होणार चांदी, सोडू नका गुंतवणुकीची संधी
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 7:03 PM

नवी दिल्ली : चांदी गुंतवणूकदारांची (Silver Investment) चांदी करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात चढउतार होत आहे. दोन महिन्यांपासून चांदीत घसरणीचे सत्र आहे. मे आणि जून महिन्यात चांदीचे दर कमी झाले. तरी पण चांदीतून गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी झाली. त्यांना मोठा फायदा झाला. सध्या अमेरिकन बाजारातील घडामोडींचा सोने आणि चांदीवर मोठा परिणाम होत आहे. पण येत्या काही काळात हा दबाव कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुडरिटर्न्सनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला चांदीने पण दरवाढीची सलामी दिली. 1 जुलै रोजी चांदीच्या किंमती वधारल्या. प्रति किलो 500 रुपयांची वाढ झाली. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 5 जुलै रोजी चांदीत 500 रुपयांची वाढ झाली. तर आज 6 जुलै रोजी किलोमागे चांदीचा भाव 800 रुपयांनी वाढले. येत्या काही दिवसांत चांदीचा भाव (Silver Price) अजून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इतकी होऊ शकते वाढ इंडियन बुलियन्स ज्वैलर्स असोसिएशननुसार, काही दिवसांपूर्वी चांदीचा भाव प्रति किलो 68000 हजार रुपयांवर येऊन ठेपला. त्यानंतर हा भाव 71000 हजारांवर आला. त्यानंतर यात चढउतार सुरु आहे. पण एका अंदाजानुसार, चांदी 72000 हजारांचा टप्पा ओलांडेल. या आठवड्यातील पाच दिवसांचा विचार करता वायदे बाजारात चांदीत 2000 अंकाची उसळी आली आहे. त्यामुळे चांदीत गुंतवणूक वाढत असल्याचे दिसून येते.

4% वाढीची शक्यता सिल्व्हर इन्स्टिट्यूटनुसार, सौरऊर्जा कंपन्यांमध्ये चांदीची मागणी वाढली आहे. यापुढे देशात प्रत्येक वर्षी सौर ऊर्जा उत्पादनासाठी चांदीमध्ये 4% वाढ होऊ शकते. सौर ऊर्जेवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरु आहे. गौतम अदानी यांचा समूह येत्या 2030 पर्यंत या क्षेत्रात भरीव गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. तर रिलायन्स समूह पण मागे नाही. त्यामुळे येत्या काळात चांदीचे भाव वाढू शकतात.

हे सुद्धा वाचा

चांदी उत्पादनात घट ऑल इंडिया ज्वेलर्स एंड गोल्डस्मिथ फेडरेशनचे (AIJGF) राष्ट्रीय महासचिव नितिन केडिया यांनी एक भीती व्यक्त केली आहे. त्यांच्यामते, येत्या काही काळात चांदीच्या उत्पादनात घट येऊ शकते. मॅक्सिको हा चांदी उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. तो मोठा चांदी उत्पादक देश आहे. पण काही नियमांतील बदल, पर्यावरणासंबंधीचे नियम यामुळे चांदी उत्पादनात घट येऊ शकते.

पेरु देशात ही परिणाम याशिवाय 2023 च्या पहिल्या चार महिन्यात पेरु या देशात चांदीच्या उत्पादनात 7% घसरण दिसून आली. चांदीचे उत्पादन घटल्याने त्याचे परिणाम आता दिसतील. मागणी जास्त असली तरी पुरवठा कमी आहे. त्यामुळे किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते.
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली.
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी.
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?.
आधी मारहाण अन् आता दहशत, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर कारवाई होणार?
आधी मारहाण अन् आता दहशत, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर कारवाई होणार?.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी... मरिन ते वांद्रे सी-लिंक प्रवास 10 मिनिटांत
मुंबईकरांसाठी मोठी बातमी... मरिन ते वांद्रे सी-लिंक प्रवास 10 मिनिटांत.
बेनाम बादशाह vs गद्दारीचा बादशाह, पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद
बेनाम बादशाह vs गद्दारीचा बादशाह, पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद.
राजकीय नेत्यांची मुजोरी अन् पोलिसांवरच शिरजोरी; व्हिडीओ व्हायरल
राजकीय नेत्यांची मुजोरी अन् पोलिसांवरच शिरजोरी; व्हिडीओ व्हायरल.
आरोपी कराडवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच डाऊट, दमानियांचा आरोप काय?
आरोपी कराडवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच डाऊट, दमानियांचा आरोप काय?.