Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Adani : अदानी-एलआयसी प्रकरण, झाली तर छप्परफाड कमाई, तोटा नाहीच नाही! दाव्यात किती सच्चाई

LIC Adani : अदानी समूहात गुंतवणुकीवरुन संसदेत आणि बाहेर सध्या घमासान सुरु आहे. एलआयसीने केंद्र सरकारच्या दबावाखाली गुंतवणूक केल्याने तोटा झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पण झालीच तर कमाई होईल, तोटा होणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात स्थिती काय आहे.

LIC Adani : अदानी-एलआयसी प्रकरण, झाली तर छप्परफाड कमाई, तोटा नाहीच नाही! दाव्यात किती सच्चाई
सध्यस्थिती काय
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 9:29 AM

नवी दिल्ली : अदानी समूहाला (Adani Group) वादळाचे तडाखे बसतच आहे. हिंडनबर्ग अहवालाने (Hindenburg Report) अदानी समूहाचे पानिपत झाले. गेल्या एका महिन्यापासून हा समूह अद्यापही आनंदाच्या बातमीसाठी चाचपडत आहे. अनेक ठिकाणी समूहाने शेअर्स गहाण, तारण ठेवले आहेत. कर्ज चुकते करण्यावर भर दिला आहे. पण हिंडनबर्गचा धक्के अधूनमधून बसत आहे. पंधरवाड्यात शेअर्समध्ये (Share Market) जोरदार उसळी दिसत असली तरी पडझडही सुरु आहे. दरम्यान अदानी समूहात गुंतवणुकीवरुन संसदेत आणि बाहेर सध्या घमासान सुरु आहे. एलआयसीने (LIC) केंद्र सरकारच्या दबावाखाली गुंतवणूक केल्याने तोटा झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पण झालीच तर कमाई होईल, तोटा होणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात स्थिती काय आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यातील गुंतवणुकीवर केंद्र सरकारने सोमवारी भाष्य केले. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी यावर उत्तर दिले. 1 जानेवारी रोजीच्या एका प्रसिद्धपत्रकाचा त्यांनी दाखला दिला. त्यानुसार, अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांमध्ये गेल्या वर्षी एलआयसीने एकूण 30,127 कोटींची गुंतवणूक केली आहे. द प्रिंटने केलेल्या दाव्यानुसार, सध्या अदानी समूहात केलेल्या गुंतवणुकीनुसार, एलआयसीला 11,000 कोटी रुपयांचा फायदा होईल.

स्टॉक एक्सचेंजकडील आकड्यांवर नजर टाकली तर चित्र स्पष्ट होते. एलआयसीने अदानी समूहाच्या सहा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांचे एकूण 50.98 कोटी शेअर आहे. सोमवारी या शेअर्सची बंद किंमतीचे गणित पाहता, एलआयसीच्या या शेअर्सचे सध्याचे बाजार मूल्य 41,087 कोटी रुपये होत आहे. एलआयसीने एकूण 30,127 कोटींची गुंतवणूक केली आहे. म्हणजे आता पण हे शेअर विक्री केले तरी एलआयसीला 11,000 कोटी रुपयांचा फायदा होईल. या शेअरमध्ये सध्या 36 टक्क्यांहून अधिकची वृद्धी दिसून आली.

हे सुद्धा वाचा

शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्चचा अदानी समूहाबाबतचा अहवाल 24 जानेवारी रोजी आला. त्यात अदानी समूहाने शेअरच्या किंमती वाढविल्याचा, अनियमिततेचा आणि फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अदानी समूहाला मोठा झटका बसला. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारालाही बसला. बाजारात लाखो गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला. तर एलआयसीच्या गुंतवणुकीवरुन राजकीय मुद्या तापला. विरोधकांनी केंद्र सरकावर आरोप केले.

विरोधकांच्या दाव्यात तथ्य नाही असे नाही. पण शेअर बाजारात जोपर्यंत तुम्ही शेअर्सची विक्री करत नाही. तोपर्यंत प्रत्यक्ष लाभ आणि नुकसान दिसून येत नाही. अदानी समूहाचे शेअर्स धडाम आदळल्याने एलआयसीने केलेली गुंतवणूक कमी झाल्याचे दिसून येते. पण आता हे शेअर वधरल्याने गुंतवणुकीचे मूल्यही वधारले आहे. आता जेव्हा एलआयसी ही गुंतवणूक काढून घेईल. त्यावेळी जी स्थिती असेल, त्यावरुन नफा तोट्याचे गणित समोर येईल.

'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.