Banking : बँकचं येणार घरी, या ग्राहकांना घरपोच मिळणार बँकिंग सेवा..

  Banking : खासगी बँकांनी ग्राहकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहचवली असली तरी आता या ग्राहकांसाठी केंद्र सरकार घरपोच बँकिंग सुविधा पोहचवणार आहेत..

Banking : बँकचं येणार घरी, या ग्राहकांना घरपोच मिळणार बँकिंग सेवा..
BankingImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 9:31 PM

नवी दिल्ली : डिजिटल क्षेत्राला (Digitalization) प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातील अनेक बँका घरोघरी जाऊन बँकिंग सुविधा (Banking Services) देत आहेत. परंतु, ही सुविधा खास ग्राहकांनाच मिळते. सर्वसामान्य नागरिकांना, वृद्ध, अपंगांना या सुविधाचा लाभ मिळत नाही. उलट बँकेबाहेर रांगेत (Que) तासनतास त्यांना ताटकाळत रहावे लागते.

आता अर्थमंत्रालयाने बँकिंग सुविधा अपंग, वयोवृद्धांना घरपोच मिळावी यासाठी कंबर कसली आहे. अर्थमंत्रालयाचे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (DFS) लवकरच ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी बँकिंग सुविधा देण्यासाठी सुरु करणार आहे.

याशिवाय डोअरस्टेप बँकिंग सुविधेसाठी एक युनिव्हर्सल फोन नंबरही देण्यात येणार आहे. त्याआधारे ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. ग्राहकांना या क्रमांकावर या सुविधेसाठी फोन करता येईल.

हे सुद्धा वाचा

आरबीआयने यापूर्वी ही डोअरस्टेप बँकिंग सेवेसाठी अधिसूचना काढली होती. केंद्रीय बँकेने विमा आणि चलन सेवा देण्याचे हे नियमात म्हटले होते. काही दिवसानंतर ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे लांबच लांब रांगेतून ज्येष्ठ नागरिकांची आणि दिव्यांग व्यक्तींची सूटका होणार आहे.

देशभरात सध्या 70 वर्षांवरील 5 कोटींहून ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) आहेत. सरकार त्यांच्यासाठी खास सेवा सुरु करणार आहे. लवकरच सरकार त्यांना घरपोच बँकिंग सुविधा (Basic Banking Services) देणार आहे. अनेक शाखांमधून ही सुविधा उपलब्ध होईल.

घरपोच बँकिंग सेवा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठीच नाही तर अपंगांसाठीही सुरु करण्यात येत आहे. या सेवासाठी ग्राहकांना फार मोठे शुल्क देण्याची गरज नाही. यापूर्वी 31 डिसेंबर 2017 आणि नंतर 30 एप्रिल 2020 रोजी पर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती. पण अद्याप ही सेवा सुरु करण्यात आलेली नाही.

भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?.
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही.
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल...
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल....