Multibagger Stock : एकाच महिन्यात पैसे दुप्पट! हा शेअर खरेदी करण्यात तुम्ही तर नाहीत ना मागे

Multibagger Stock : एकाच महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. हा शेअर खरेदी करणाऱ्यांना महिनाभरातच लॉटरी लागली. तुम्हाला पण करायची का दुप्पट कमाई?

Multibagger Stock : एकाच महिन्यात पैसे दुप्पट! हा शेअर खरेदी करण्यात तुम्ही तर नाहीत ना मागे
घरात कुणी नसल्याची संधी साधत रोकड चोरली
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 9:14 AM

नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून दबावाखाली असलेल्या ब्राईटकॉम ग्रुप लिमिटेडच्या (Brightcom Group Share) शेअरने गेल्या महिन्याभरात जोरदार आघाडी घेतील आहे. कंपनीचे शेअर एकाच महिन्यात दुप्पट झाले. गुरुवारी या मल्टिबॅगर शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले. BSE वर हा शेअर काल 19.63 रुपयांवर (Brightcom Group Share Price Today) ट्रेड करत होता. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या शेअरने मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत. या कालावधीत हा शेअर 862 टक्के उसळला. दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी ब्राईटकॉमच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी केली. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये विक्रीचे सत्र होते. एका वर्षातच हा शेअर 66 टक्क्यांनी गडगडला. पण त्यानंतर आता या शेअरने तुफान बॅटिंग केली आहे.

कामगिरी कशी यावर्षात, 2023 मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये जवळपास 33 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या सहा महिन्यात हा शेअर 45 टक्क्यांनी घसरला. एका महिन्यात या शेअरच्या घसरणीला लगाम लागला आहे. आता या शेअरने जोरदार उडी घेतली. शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकीस्तरावर 63 रुपयांवर पोहचला होता. तर या शेअरने 52-आठवड्यांचा निच्चांकी 9.27 रुपयांची घसरण पाहिली आहे.

आता तर अप्पर सर्किट गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. पाच व्यापारी सत्रात हा शेअर 20.50 टक्क्यांनी वधारला. एका महिन्यात या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये 101.75 टक्के तेजी दिसून आली. एका महिन्यात या शेअरचा भाव 9.73 रुपये होता. आता हा भाव वाढून 19.63 रुपयांवर पोहचला.

हे सुद्धा वाचा

असा झाला फायदा दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या शेअरने मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत. या कालावधीत हा शेअर 862 टक्के उसळला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2 मे, 2023 रोजी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते आणि ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर आता या गुंतवणूकीचे मूल्य 2.04 लाख रुपये इतके झाले असते.

खरेदी केले 2.5 कोटी शेअर दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी (Investor Shankar Sharma) ब्राईटकॉम ग्रुपच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. जानेवारी-मार्च 2023 च्या तिमाहीत त्यांनी गुंतवणूक केली. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, शंकर शर्मा यांच्याकडे ब्राईटकॉम ग्रुपचे 2.5 कोटी शेअर असून त्यांची 1.24 टक्के हिस्सेदारी आहे. सध्या त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 49 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ब्राईटकॉम ग्रुपचे बाजारातील भांडवल जवळपास 3961 कोटी रुपये आहे.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.