Ice Cream Company : आनंद पोटात माईना, आईसक्रीम कंपनीने केले मालामाल, शेअर ठरला रॉकेटसिंग

Ice Cream Company : दोन वर्षांनी 100 वर्षांची होणाऱ्या या कंपनीचा शेअर रॉकेटसिंग ठरला आहे. आईसक्रीम, फ्लेवर्ड मिल्क, फ्रोझन डेझर्ट आणि इतर डेअरी उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या या कंपनीच्या शेअरने थेट 15 टक्क्यांची उसळी घेतली.

Ice Cream Company : आनंद पोटात माईना, आईसक्रीम कंपनीने केले मालामाल, शेअर ठरला रॉकेटसिंग
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 2:37 PM

नवी दिल्ली : आईसक्रीम कोणाला आवडत नाही. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सूटते. या आईसक्रममुळे शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूकदारांना गोडावा तर चाखायला मिळालाच पण जोरदार कमाई ही करता आली. आईसक्रीम सेक्टरमधील (Ice Cream Industries) अग्रगण्य असणाऱ्या या कंपनीला 2026 पहिले आऊटलेट टाकून शंभर वर्षे पूर्ण होतील. त्यापूर्वीच या कंपनीच्या शेअरमध्ये उसळी आली आहे. सोमवारी 10 जूलै रोजी कंपनीच्या शेअरने 15 टक्क्यांची उडी मारली. 52 आठवड्यातील हा कंपनीचा उच्चांक आहे. गुंतवणूकदारांना (Investors) डबल लॉटरी लागली. या कंपनीचा शेअर सध्या रॉकेटसारखी मोठी झेप घेत आहे. येत्या काही वर्षांत हा बाजारातील डॉर्क हॉर्स ठरेल, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

पूर्ण होतील 100 वर्षे खाद्य आणि पेय पदार्थ तयार करणारी वाडिलाल कंपनीचे वाडीलाल (Vadilal) आईसक्रीम तुम्ही खाल्ले असेलच. 1926 मध्ये या कंपनीची गुजरातमध्ये सुरुवात झाली होती. पहिले आऊटलेट सुरु करण्यात आले होते. आईसक्रीम, फ्लेवर्ड मिल्क, फ्रोझन डेझर्ट आणि इतर डेअरी उत्पादनात कंपनी अग्रेसर आहे. रेडी-टू-ईट, रेडी-टू-सर्व्ह अशा श्रेणीतही कंपनीचे उत्पादनं आहेत. गुजरात आणि उत्तर प्रदेशात कंपनीचे प्लँट आहेत.

उच्चांकी कामगिरी या आठवड्याच्या पहिल्या व्यापारी सत्रात शेअर बाजार हिरव्या निशाणीवर किंचित वाढीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 63.64 अंकांनी वधारुन 65,344.17 अंकांच्या स्तरावर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 24 अंकांच्या तेजीसह 19,355.90 अंकांच्या स्तरावर बंद झाला.

हे सुद्धा वाचा

शेअरची रॉकेट भरारी वाडीलाल शेअर्सने सोमवारी मोठी उसळी घेतली. कंपनीच्या शेअरने 15 टक्क्यांची उडी मारली. 52 आठवड्यात कंपनीने उच्चांक गाठला. हा शेअर 3,294.65 रुपयांवर पोहचला. नंतर यात घसरण झाली. पुन्हा हा शेअर वधारुन 3150 रुपयांवर बंद झाला.

3000 कोटी रुपयांचा सौदा वाडीलाल इंडस्ट्रीजचा शेअर सध्या रॉकेटच्या गतीने उडत आहे. बेन कॅपिटल (Bain Capital) दिग्गज आईसक्रीम निर्माता वाडीलालमधील काही हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी चर्चा सुरु आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, हा सौदा जवळपास 3000 कोटी रुपयांचा असू शकतो. या करारासाठी अगोदरच तयारी करण्यात आली आहे. डिसेंबर 2022 मध्ये शेअरधारकांनी यासंबंधीची मंजूरी दिल्याची चर्चा आहे.

गुंतवणूकदारांना लॉटरी वाडीलाल कंपनीचा शेअर सातत्याने आगेकूच करत आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाला. गेल्या एका महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना 15 टक्के आणि सहा महिन्यात 15 टक्के रिटर्न दिला आहे. एकाच वर्षात या कंपनीच्या शेअरचा भाव 50 टक्क्यांनी म्हणजे जवळपास 1058 रुपयांनी वधारला आहे.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअरच्या कामगिरीची माहिती आहे. गुंतवणूकदारांनी अभ्यास करुन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करावी.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.