Milk : दुधाला महागाईची उकळी, 8 महिन्यांत झपझप वाढले भाव, आता दर वाढणार का?

| Updated on: Oct 16, 2022 | 4:14 PM

Milk : महागाईचे चटके कमी होते की काय म्हणून अमूल आणि मदर डेअरी यांनी दुधाच्या किंमती पुन्हा वाढविल्या

Milk : दुधाला महागाईची उकळी, 8 महिन्यांत झपझप वाढले भाव, आता दर वाढणार का?
म्हशींना ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन देणाऱ्या सहा आरोपींना अटक
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : खाद्यान्न वस्तूचे (Food Items) भाव दिवसागणिक सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. रेकॉर्डब्रेक महागाईने (Record break Inflation) जगणे मुश्किल झाले असतानाच अमूल (Amul)आणि मदर डेअरी (Mother Dairy) या दूध उत्पादक कंपन्यांनी पुन्हा दुधाचे दर (Milk Rate) वाढविले.शनिवारी या डेअरींनी दूध दरात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ केली.

ऐन सणासुदीत अचानक दुधाचे भाव वाढवण्यात आले. परिणामी सर्वसामान्य लोकांच्या खिशावर महागाईचा भार पडला आहे. अमूल आणि मदर डेअरीने सध्या जास्त फॅट असलेल्या दुधाच्याच किंमती वाढवल्या आहेत. या वर्षभरात या दोन्ही दूध डेअरींनी तिसऱ्यांदा दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्चपासून आतापर्यंत या दूध उत्पादक कंपन्यांनी तिसऱ्यांदा दूधाचे दर वाढवले आहेत. आतपर्यंत या कंपन्यांनी 6 रुपयांची दरवाढ केली आहे. शनिवारी अमूलच्या एक लिटर फूल क्रीम (Amol Gold) दूध दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे किंमती 61 रुपयांहून 63 रुपये झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

तर अर्धा लिटर दुधाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. या किंमती 30 रुपयांवरुन 31 रुपये करण्यात आल्या आहेत. अमूलने म्हशीच्या दुधाच्या किंमतीत प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. किंमती आता 61 रुपयांहून 63 रुपये करण्यात आल्या आहेत. गुजरात वगळता संपूर्ण देशात या किंमती लागू करण्यात आल्या आहेत.

गायीचे दुधाचे दरही दोन रुपये प्रति लिटर वाढविण्यात आले आहेत. मदर डेअरीचे गायीचे दूध पूर्वी 53 रुपये प्रति लिटर मिळत होते. आता हा दर दोन रुपये प्रति लिटरने महागला आहे.

ऑगस्ट महिन्यात अमूलने दूध किंमती वाढविताना वाढत्या खर्चाचे कारण पुढे केले होते. तर इतर डेअरी उत्पादन कंपन्यांनी चारा महाग झाल्याचे कारण देत दूध दरवाढ करावी लागत असल्याचे म्हटले होते. चाऱ्याच्या किंमती 20 टक्क्यांनी महाग झाल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे.

या आठवड्याच्या सुरुवातील आलेल्या किरकोळ महागाई आकड्यांनुसार चाराच्या किंमतीत 25 टक्के वाढ झाली आहे. हा आकडा ऑगस्ट महिन्याच्या आकड्यापेक्षा कमी आहे. तरीही या दरवाढीचा दूधाच्या किंमतीवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा दरवाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.