E Scooter | ई-स्कूटरची विक्री जोरात, इतक्या इलेक्ट्रीक दुचाकींची नोंदणी

E Scooter | ई-स्कूटरने ऑगस्ट महिन्यात विक्रीत जबरदस्त तेजी नोंदवली. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती पाहता हा बदल सकारात्मक तर आहेच पण व्यावहारिकही असल्याचे दिसून येते.

E Scooter | ई-स्कूटरची विक्री जोरात, इतक्या इलेक्ट्रीक दुचाकींची नोंदणी
E-Scooterची विक्री जोरातImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 4:46 PM

E-Scooter | ई-स्कूटरने (E Scooter)ऑगस्ट महिन्यात (August) विक्रीत जबरदस्त तेजी नोंदवली. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती पाहता हा बदल सकारात्मक तर आहेच पण व्यावहारिकही असल्याचे दिसून येते.  इलेक्ट्रिक वाहन नोंदणीत (Electric Vehicle Registration) ऑगस्ट महिन्यात तब्बल 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा टक्का अर्थात कमी असला तरी एका महिन्यासाठी हा आकडा महत्वाचा आहे. सरकारच्या धोरणाला जनतेतूनही प्रतिसाद मिळत असल्याचे हे उदाहरण आहे.

अशी वाढली विक्री

वाहन नोंदणी संकेतस्थळावरुन याविषयीची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, ई-स्कुटरच्या नोंदणीची संख्या जुलै महिन्यात, 33,099 ईलेक्ट्रिक स्कूटरची नोंदणी झाली होती. तर 31 ऑगस्ट रोजी हा आकडा वाढला. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हा आकडा 36,463 इतका झाला. म्हणजे जवळपास तीन हजार वाहनांची नोंदणी वाढली. इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती बघता विक्रीतील वाढ दिलासादायक आहे. यामध्ये बजाज ऑटो आणि टीव्हीएस कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश नाही.

अथरची मजबूत दावेदारी

ई-स्कूटर विक्रीत वाढ करण्यात अनेक तज्ज्ञ अथरचा सहभाग असल्याचे सांगतात. बेगंळूरीतील या कंपनीने जुलै महिना अखेर जे नवीन मॉडेल बाजारात उतरवले त्यामुळे विक्रीत जोरदार वाढ झाली. वाहनांच्या नोंदणीत चौपट वाढ दिसून आली.

हे सुद्धा वाचा

हिरो ही मागे नाही

या स्पर्धेत हिरो कंपनीही मागे नाही. चार महिन्यांनी हिरो कंपनीने इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपला शिक्का खणखणीत वाजवला. एप्रिल महिन्यात कंपनीने 13,000 ई-बाईक्सची विक्री केली होती. चार महिन्यांनी ऑगस्ट महिन्यात कंपनीने विक्रीत 10,000 चा आकडा पार केला आहे. चिप नसल्याने कंपनीला मध्यंतरी फटका बसला होता.

अथरची घौडदौड

ईलेक्ट्रिक बाजारात अथरने मजबूत दावेदारी केली आहे. कंपनीने जुलै महिन्यात 1,289 ई स्कूटरची विक्री केली होती. ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या 5,104 ई-वाहनांसाठी नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मागणी आहे.

नवीन मॉडेल बाजारात

अथर कंपनीने 1.39 लाख रुपयांची जेन 3 450एक्स, 1.17 लाख रुपयांची ए​थर 450 प्लस जेन 3 स्कूटर बाजारात उतरवली आहे. तिलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तर आकडा 4 टक्क्यांवर

बाजारातील दोन दिग्गज कंपन्या बजाज ऑटो आणि टीव्हीएसच्या ई-स्कूटरचे आकडे जर या विक्रीत गृहीत धरले तर ई-स्कूटरची विक्रीतील हिस्सा 4 टक्क्यांवर पोहचेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.