कोणतीही मेहनत न करता असे कमवा पगारा इतकी रक्कम, पाहा काय आहे फॉर्म्युला

| Updated on: Dec 07, 2023 | 1:56 PM

Saving formula : तुम्हाला जर तुमच्या पगारा इतकाच आणखी इनकम मिळवायचे असेल तर तुम्ही ते सहज करु शकता. यासाठी एक फॉर्म्युला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा पगार आहे तितकाच पैसा कमवू शकता. काय आहे तो फॉर्म्युला जाणून घ्या.

कोणतीही मेहनत न करता असे कमवा पगारा इतकी रक्कम, पाहा काय आहे फॉर्म्युला
mutual fund sip
Follow us on

Investment plan : नोकरी करणाऱ्या लोकांची नेहमीच तक्रार असते की, पगार पुरत नाही. पैशांची बचत होत नाही. कारण पगार खूप कमी आणि खर्च जास्त आहे. भविष्यातील नियोजन नाही. पण जर पगार आहेत तेवढंच आणखी इनकम जर मिळणार असेल तर. तर तुम्ही तुमच्या पगारा इतकंच आणखी नवीन इनकम कमवू शकता. कारण दर महिन्याला तुम्ही इतर मार्गांनी पगारापेक्षा जास्त कमाई करू लागाल.  यामागे एक विशेष सूत्र काम करते. काय आहे ते गणित समजून घ्या

उदाहरणार्थ, तुमचा मासिक पगार 50 हजार रुपये असेल आणि तुम्हाला दरमहा आणखी 50 हजार रुपये वेगळे उत्पन्न हवे आहे, तर त्यासाठी तुम्हाला दरमहा तुमच्या पगारातील किमान 30 टक्के बचत करावी लागेल.

याचा अर्थ तुम्हाला दरमहा ५० हजार रुपयातून तुम्हाला १५ हजार रुपये बचत करावी लागेल. तुम्हाला काय करायचे आहे की, बचत केलेले पैसे तुम्हाला म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये गुंतवायचे आहेत. कारण येथे चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दर महिन्याला 15,000 रुपयांची एसआयपी केली तर त्याला 10 वर्षांत सुमारे 41,79,859 रुपये 15 टक्के परतावा मिळू शकतो.

तुम्हाला हे अधिक सोपे करुन सांगतो. जर तुम्ही दर महिन्याला SIP मध्ये रु. 15000 ची गुंतवणूक केली तर 5 वर्षांनंतर  ही रक्कम सुमारे 13.5 लाख रुपये होईल. त्यानंतर गुंतवणुकदाराने पुढील तीन वर्षांसाठी याच पद्धतीने अधिक पैसे जमा केल्यास, 8 वर्षांनंतर जमा केलेले भांडवल सुमारे 28 लाख रुपयांपर्यंत वाढेल आणि 10 वर्षात ही रक्कम वाढून 41,79,859 रुपये होईल.

बहुतेक लोकांचा पगार ७ ते ८ वर्षात दुप्पट होतो. जर पगारात वार्षिक 10 टक्के वाढ झाली तर दरमहा 50 हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीचा पगार 8 वर्षांत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त होईल. जर गुंतवणूकदाराने वाढत्या पगारासह गुंतवणुकीची रक्कम वाढवली तर 10 व्या वर्षी गुंतवणूकदार त्याच्या पगारातून दरमहा 35,369 रुपये वाचवण्यास सुरवात करेल.

पगार वाढला की गुंतवणूक वाढवा

जर ५० हजार रुपये पगार असलेल्या व्यक्तीने दरमहा १५,००० रुपयांनी एसआयपी सुरू केली आणि त्यात दरवर्षी १० टक्के वाढ केली, तर १०व्या वर्षी गुंतवणूकदाराची एसआयपी रक्कम ३५ हजार रुपये होईल. त्यानुसार 10 वर्षात 15 टक्के वार्षिक परताव्यावर एकूण रक्कम 59,36,129 रुपये होईल. जर आपण हा ट्रेंड 15 वर्षे चालू ठेवला तर आपल्याला एकूण 1,66,49,992 रुपये मिळतील. आता तुम्ही समजू शकता की दर महिन्याला तुमच्या पगारातील 30 टक्के बचत करून तुम्ही 10 ते 15 वर्षांत किती मोठी रक्कम जमा करू शकता.

जेव्हा तुम्ही तुमच्या पगाराच्या 30 टक्के रक्कम 10 वर्षांसाठी गुंतवता, तेव्हा तुमच्याजवळ सुमारे 60 लाख रुपये असतील. 15 वर्षांत ती 1.66 कोटी रुपये होईल. आता कल्पना करा की ही रक्कम थेट बँकेत फिक्स डिपॉझिट (FD) म्हणून जमा केल्यास, तुम्हाला दरमहा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल. म्हणजेच या मार्गाने तुम्हाला तुमच्या पगाराएवढे उत्पन्न मिळू लागेल.

पगार जास्त वाढला तर बचतही जास्त होईल, तुम्ही इतरत्र गुंतवू शकता. जसे स्टॉक मार्केट, PPF, गोल्ड बॉण्ड्स, रिअल इस्टेट आणि शॉर्ट टर्म फंड. 10 ते 15 वर्षांनंतर तुम्ही या ठिकाणांहून परतावा मोजता तेव्हा तुम्हाला तुमच्या पगारात गुंतवणूक करण्याची गरज भासणार नाही. कारण गुंतवणुकीतून तेवढेच उत्पन्न मिळू लागेल.

गुंतवणूकदारासाठी मूळ रकमेपेक्षा व्याज नेहमीच अधिक मौल्यवान असते. पण जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हाच तुम्हाला व्याज मिळेल. नोकरदार लोकांचे उत्पन्न हळूहळू वाढते. म्हणूनच, आजच्या युगात, SIP हा एक उत्तम पर्याय आहे, ज्याद्वारे दीर्घ मुदतीसाठी छोटी गुंतवणूक करून मोठा निधी तयार केला जाऊ शकतो.

दरमहा पगारातील ३० टक्के बचत करणे आणि गुंतवणूक करणे थोडे कठीण आहे. परंतु जेव्हा तुम्ही उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल साधता तेव्हा कोणतीही अडचण येणार नाही. सुरुवातीला पगारातील 30 टक्के बचत करायची असेल तर सर्वप्रथम अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. हे कसे शक्य होईल?

उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ आवश्यक

एका अंदाजानुसार, पगारदार वर्ग दरमहा आपल्या उत्पन्नातील 10 टक्के वाया घालवतो, ज्याची बचत तुम्ही सहज करू शकता. याशिवाय तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्याचा अनाठायी वापर टाळा. प्रवास, बाहेर खाणे, महागडे गॅजेट्स खरेदी करणे कमी करा. याशिवाय, ऑफर्समुळे त्या वस्तू खरेदी करू नका ज्या तुमच्यासाठी आवश्यक नाहीत. अशा प्रकारे तुम्ही दरमहा तुमच्या पगारातील 30 टक्के बचत करू शकता.