Economic Survey : अर्थव्यवस्था गती पकडण्याची आशा, GDP 6-6.5 टक्क्यापर्यंत पोहोचण्याचा अंदाज
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2020 (Economic Survey 2020) संसदेत सादर केला. या अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाचे आकडे सादर करण्यात आले आहेत
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2020 (Economic Survey 2020) संसदेत सादर केला. या अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाचे आकडे सादर करण्यात आले आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षात GDP विकासदर 6 ते 6.5 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात (Economic Survey 2020) आला आहे.विकासदराचे हे आकडे चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. सरकारने चालू आर्थिक वर्षातील अंदाजित जीडीपी विकासदर 5 टक्के जाहीर केला आहे. मात्र येत्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था गती पकडेल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
आर्थिक सर्वेक्षण 2019-20 मध्ये आर्थिक विकास दर दर 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 2018-19 आर्थिक वर्षात जीडीपीच्या वाढीचा दर 6.8 टक्के होता.
2019 मधील आर्थिक सर्वेक्षण अहवाल
2018-19 मध्ये विकास दर 6.8 टक्के राहिला होता. मागील काही वर्षांच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात जीडीपी विकास दर 2017- 18 मध्ये 7.2 टक्क्यांवरुन 2018-19 मध्ये 6.8 टक्क्यांवर घसरला होता. ही घसरण चालूच आहे.
वर्ष आणि विकासदर
- 2017-18 : 7.2 टक्के
- 2018-19 :8 टक्के
- 2019-20 : 5 टक्के
- 2020-21 : 6 ते 6.5 अपेक्षित
आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
- आर्थिक वर्ष 2020-21 GDP दर 6 ते 6.5 अपेक्षित
- 2020 मध्ये वित्तीय तूट वाढवण्याची गरज
- अनावश्यक खर्चाला कात्रीची गरज
- 2020 मध्ये करांमधून मिळणाऱ्या अंदाजित उत्पन्नात घट होण्याची शक्यता
- सरकारी खर्च वाढवण्यासाठी अनुदान घटवण्याची गरज
- जीएसटी महसुलावर कर उत्पन्न अवलंबून
- वित्तीय तूट कमी करण्यासाठी अन्नधान्यावरील अनुदान कपातीची गरज
- सरकारी खर्च वाढल्यास खासगी गुंतवणुकीत वाढ शक्य
- देशात घरांच्या किमती खूपच जास्त
- बिल्डरांनी विक्री न झालेल्या घरांच्या किमतीत कपात करावी
- घरांची विक्री झाल्यास बँकांना फायदा
- महागाई वाढल्याने मागणी घटली
- जागतिक मंदीचा निर्यातीवर परिणाम होऊ शकतो
- जागतिक विकास वेग मंदावण्याची शक्यता
- अमेरिका-इराण तणावामुळे क्रूड ऑईलच्या किमती वाढण्याची शक्यता
- क्रूडवाढीमुळे रुपयाची घसरगुंडी होण्याची शक्यता