Economic Survey : अर्थव्यवस्था गती पकडण्याची आशा, GDP 6-6.5 टक्क्यापर्यंत पोहोचण्याचा अंदाज

| Updated on: Jan 31, 2020 | 3:46 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2020 (Economic Survey 2020)  संसदेत सादर केला. या अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाचे आकडे सादर करण्यात आले आहेत

Economic Survey : अर्थव्यवस्था गती पकडण्याची आशा, GDP 6-6.5 टक्क्यापर्यंत पोहोचण्याचा अंदाज
Follow us on

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2020 (Economic Survey 2020)  संसदेत सादर केला. या अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाचे आकडे सादर करण्यात आले आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षात GDP विकासदर 6 ते 6.5 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात (Economic Survey 2020) आला आहे.विकासदराचे हे आकडे चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. सरकारने चालू आर्थिक वर्षातील अंदाजित जीडीपी विकासदर 5 टक्के जाहीर केला आहे. मात्र येत्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था गती पकडेल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

आर्थिक सर्वेक्षण 2019-20 मध्ये आर्थिक विकास दर दर 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 2018-19 आर्थिक वर्षात जीडीपीच्या वाढीचा दर 6.8 टक्के होता.

 2019 मधील आर्थिक सर्वेक्षण अहवाल

2018-19 मध्ये विकास दर 6.8 टक्के राहिला होता. मागील काही वर्षांच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात जीडीपी विकास दर 2017- 18 मध्ये 7.2 टक्क्यांवरुन 2018-19 मध्ये 6.8 टक्क्यांवर घसरला होता. ही घसरण चालूच आहे.

वर्ष आणि विकासदर

  • 2017-18 : 7.2 टक्के
  • 2018-19 :8 टक्के
  • 2019-20 : 5 टक्के
  • 2020-21 : 6 ते 6.5 अपेक्षित

आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

  • आर्थिक वर्ष 2020-21 GDP दर 6 ते 6.5 अपेक्षित
  • 2020 मध्ये वित्तीय तूट वाढवण्याची गरज
  • अनावश्यक खर्चाला कात्रीची गरज
  • 2020 मध्ये करांमधून मिळणाऱ्या अंदाजित उत्पन्नात घट होण्याची शक्यता
  • सरकारी खर्च वाढवण्यासाठी अनुदान घटवण्याची गरज
  • जीएसटी महसुलावर कर उत्पन्न अवलंबून
  • वित्तीय तूट कमी करण्यासाठी अन्नधान्यावरील अनुदान कपातीची गरज
  • सरकारी खर्च वाढल्यास खासगी गुंतवणुकीत वाढ शक्य
  • देशात घरांच्या किमती खूपच जास्त
  • बिल्डरांनी विक्री न झालेल्या घरांच्या किमतीत कपात करावी
  • घरांची विक्री झाल्यास बँकांना फायदा
  • महागाई वाढल्याने मागणी घटली
  • जागतिक मंदीचा निर्यातीवर परिणाम होऊ शकतो
  • जागतिक विकास वेग मंदावण्याची शक्यता
  • अमेरिका-इराण तणावामुळे क्रूड ऑईलच्या किमती वाढण्याची शक्यता
  • क्रूडवाढीमुळे रुपयाची घसरगुंडी होण्याची शक्यता