खाद्य तेलाच्या किमती भडकल्या; अन्न महागाईमध्ये महिन्याभरात 17 टक्क्यांची वाढ, धान्याच्या भावात देखील तेजी

रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine Crisis) जगभरात खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यूएन फूड एजेन्सीच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. फूड अँण्ड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गोनायजेशन (Food and Agriculture Organization) अर्थात एफएओ (FAO)कडून प्राप्त माहितीनुसार जगभरात धान्य आणि तेलाच्या किमती वाढल्यामुळे अन्न महागाईमध्ये वाढ झाली आहे.

खाद्य तेलाच्या किमती भडकल्या; अन्न महागाईमध्ये महिन्याभरात 17 टक्क्यांची वाढ, धान्याच्या भावात देखील तेजी
खाद्यतेल
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 8:02 PM

रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine Crisis) जगभरात खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यूएन फूड एजेन्सीच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. फूड अँण्ड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गोनायजेशन (Food and Agriculture Organization) अर्थात एफएओ (FAO)कडून प्राप्त माहितीनुसार जगभरात धान्य आणि तेलाच्या किमती वाढल्यामुळे अन्न महागाईमध्ये वाढ झाली आहे. या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, गेल्या महिन्याभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा नकारात्मक परिणाम हा जगभरातील अन्नधान्याच्या बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाईमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. खाद्य तेल आणि अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने एफएओ फूड प्राइस इंडेक्समध्ये तब्बल तेरा टक्क्यांची वाढ झाली आहे. खाद्य तेलासोबतच कच्चे तेल आणि मौल्यवान धातूनच्या किमतीमध्ये देखील तेजी आल्याचे पहायला मिळत आहे.

अन्न महागाईमध्ये वाढ

रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये अन्न महागाईचा इंडेक्ट 159.3 च्या सर्वोच्च स्थरावर पोहोचला आहे. फेब्रवारी महिन्यात अन्न महागाईचा इंडेक्ट 140.7 वर होता. म्हणजेच काय तर अवघ्या एका महिन्यात अन्न महागाईमध्ये तब्बल 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. अन्न महागाई वाढण्यासाठी मुख्य घटक कारणीभूत आहे, तो म्हणजे खाद्यतेलाच्या गगनाला भिडलेल्या किमती. मार्च महिन्यात खाद्य तेलाच्या किमतीमध्ये तब्बल 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. खाद्यतेल आतापर्यंतच्या सर्वोच्च स्थरावर पोहोचले आहे. खाद्यतेलासोबतच साखर आणि दूधाचे देखील भाव वाढले आहेत.

सर्वच वस्तुंच्या दरामध्ये वाढ

रिपोर्टनुसार रशिया आणि युक्रेन युद्धाचा जागतिक आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिकेसह नाटोचे सदस्य असलेल्या युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातल्या मुळे याचा फटका हा वस्तुच्या आयात निर्यातीला बसला आहे. वस्तुची आयात निर्यात प्रभावित झाली असून, पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने वस्तुचे दर गगनाला भिडले आहेत. कच्चा तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. सोबतच गहू आणि इतर धान्याच्या दरामध्ये देखील तेजी दिसून येत आहे. अन्न महागाई वाढल्याने त्याचा परिणाम हा हगंर इंडेक्सवर होत असून, हगर इडेक्स देखील वाढला आहे.

संबंधित बातम्या

आत लवकरच डेबीट कार्डशिवाय ATM मधून काढता येणार पैसे, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा

Real Estate : रिअल इस्टेटला बूस्टर, घर विक्रीत 83 टक्क्यांनी वाढ; मुंबईत दुप्पटीनं खरेदी

Maharashtra Load Shedding |गुजरात, आंध्रानंतर आता महाराष्ट्राचा नंबर? लोडशेडिंग होणार का? ऊर्जामंत्री म्हणाले…

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.