Edible Oil : ऐन थंडीत खाद्यतेलाचे भाव कडाडले; किलोमागे 25 रुपयांची वाढ, ग्राहकांवर संक्रांत

Edible Oil Price Hike : नवी मुंबईतील APMC बाजारात खाद्य तेलाचे दर वाढले. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या एपीएमसी बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर हे वाढले आहेत. तेलाच्या एका लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ झाल्याचं व्यापार्‍यांनी म्हटले आहे.

Edible Oil : ऐन थंडीत खाद्यतेलाचे भाव कडाडले; किलोमागे 25 रुपयांची वाढ, ग्राहकांवर संक्रांत
खाद्यतेलाचा भडका, भाव कडाडले
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 3:57 PM

गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले तेलाचे दराला महागाईची फोडणी बसली आहे. सोयाबीन दरात वाढ आणि केंद्र सरकारच्या 20 टक्के आयात शुल्क लावले आहे. या सर्व घडामोडींमुळे खाद्यतेलाच्या दरात जवळपास 30 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील APMC बाजारात खाद्य तेलाचे दर वाढले. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या एपीएमसी बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर हे वाढले आहेत. तेलाच्या एका लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ झाल्याचं व्यापार्‍यांनी म्हटले आहे.

जनतेच्या रेट्यानंतर दर खाली

दोन वर्षांपूर्वी देशात महागाईची लाट आली होती. पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या होत्या. सोबतच किरकोळ महागाईने डोके वर काढले होते. खाद्यतेलाचा भडका उडाला होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनक्षोभ वाढला होता. त्यावेळी सरकारने इतर देशातून पामतेल आणि इतर तेल आयात करण्याचे धोरण आखले. त्यामुळे देशातंर्गत खाद्यतेलाच्या किंमती जमिनीवर आल्या.

हे सुद्धा वाचा

आता केंद्र सरकारने सोयाबीन दर वाढवला आहे. तर 20 टक्के आयात शुल्क आकारणी सुरू केली आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात दरमहा 7 ते 8 टन तेलाची आयात होते. पण मागणी वाढल्याने तेलाची आवक कमी झाली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्याने खाद्यतेलाचा भाव कडाडला आहे. तेलाचे 30 टक्के दर वधारले आहेत, अशी माहिती एपीएमसीमधील व्यापार्‍यांनी दिली आहे.

असे भडकले खाद्यतेल

सूर्यफूल तेलाचा भाव पूर्वी 120 रुपये प्रति किलो होता. आता त्यात किलोमागे 20 रुपयाची भाव वाढ झाली. सूर्यफूल तेल प्रति किलो 140 रुपयांवर पोहचले. पाम तेलाचा भाव 100 रुपये प्रति किलो होता. हा भाव आता 135-140 रुपयांवर पोहचला आहे. किलोमागे पाम तेल 35-40 रुपयांनी महागले आहे. तर सोयाबीन तेल 115-120 रुपये प्रति किलोवरून थेट 130-135 रुपयांवर पोहचले आहे. किलोमागे 20 रुपयांची दरवाढ दिसून येत आहे. ऐन थंडीत ग्राहकांना वाढीव दराने तेल खरेदी करावे लागत आहे. या महागाईने किचन बजेट कोलमडले आहे.

राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.