Edible oil rates : खाद्यतेल होणार स्वस्त; तेल दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

वाढत असलेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून काही महत्त्वाच्या उपाय-योजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता पाम तेलाचा आधारभूत आयात दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edible oil rates : खाद्यतेल होणार स्वस्त; तेल दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
खाद्यतेल
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 2:15 PM

नवी दिल्ली : सध्या देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. भाजीपाल्यापासून ते अन्नधान्यापर्यंत आणि खाद्य तेलापासून (Edible oil rates) ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच गोष्टींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी आता केंद्र सरकारकडून (Central Government) काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपू्र्वीच पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली. अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. आता पेट्रोल, डिझेलनंतर केंद्रांने आपला मोर्चा खाद्य तेलाकडे वळवला आहे. खाद्य तेलाच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने पाम तेलाचा आधारभूत आयात दर कमी केला आहे. तर दुसरीकडे सोयाबीन तेल आणि चांदीच्या आयात किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. याबाबत केंद्रांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. पाम तेलाच्या आधारभूत आयात किमतीमध्ये कपात करण्यात आल्याने येत्या काळात पाम तेल स्वस्त होऊ शकते, तर सोयाबीन तेल तसेच सोने-चांदी महाग होण्याची शक्यता आहे.

इंडोनेशियाने निर्यात बंदी उठवली

दरम्यान भारतात पाम तेल स्वस्त होण्याचे आणखी एक कारण म्हणजे इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवरील उठवलेली बंदी हे आहे. इंडोनेशिया हा जगातील प्रमुख पाम तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र इंडोनेशियामध्ये महागाई वाढल्याने महागाईवर नियंत्रण घालण्यासाठी तेथील सरकारने पाम तेल निर्यातीवर बंदी घालती होती. भारत इंडोनेशिमधून मोठ्या प्रमाणात पाम तेल खरेदी करतो. मात्र इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवर बंदी घातल्याने तेलाचा तुटवडा निर्माण झाला होतो. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढले. परंतु आता इंडोनेशियाने तेल निर्यातीवरील निर्बंध उठवले आहेत त्यामुळे आता पुरवठा सुरूळीत सुरू झाल्यास पाम तेले आणखी स्वस्त होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

खाद्य तेलाच्या दरावर युद्धाचा परिणाम

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे दोन्ही देश खाद्यतेलाचे प्रमुख निर्यातदार देश आहेत. रशिया आणि युक्रेनकडून आपण मोठ्याप्रमाणात सूर्यफुलाच्या तेलाची आयात करतो. मात्र सध्या युद्ध सुरू असल्याने तेलाचा पुरवठा ठप्प आहे. एकीकडे इंडोनेशियाने घातलेल्या निर्यात बंदीमुळे पाम तेलाचा तुटवडा तर दुसरीकडे युक्रेनमधून होणारी सूर्यफुलाच्या तेलाची आवक बंद असल्याने खाद्य तेलाची आवक घटली. मात्र आता इंडोनेशियाने निर्यातीवरील निर्बंध उठवल्याने भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.