Edible Oil Price : खुशखबर, लवकरच खाद्य तेलाची स्वस्ताई, आयात तेलाच्या किंमतीत पुन्हा घसरण..
Edible Oil Price : खाद्य तेल पुन्हा स्वस्त होण्याची शक्यता आहे..
नवी दिल्ली : तुमच्या घराचे बजेट अजून कमी होण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या किंमती (Edible Oil price) अजून स्वस्त होणार आहेत. विदेशातून आयात करण्यात येणाऱ्या खाद्य तेलाच्या किंमती घसरल्याने खाद्य तेलाच्या बाजारात मोहरी (Mustard), सोयाबीन (Soybean), शेंगदाण्यासहित तिळाच्या तेलाच्या किंमतीत घसरण नोंदविण्यात आली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, परदेशातून आयात खाद्यतेलाच्या (Imported Oil) किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे.
दरम्यान खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने एकीकडे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे तर ऑईल मिलसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. आयात तेलाचे भाव सातत्याने घसरत असल्याने ऑईल मिलसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या आयात तेलापेक्षा देशातील खाद्य तेलाचे दर जास्त आहेत. एका व्यक्तीसाठी एका दिवशी 50 ग्रॅम तेलाचा वापर होत असला तरी देशातील महागाईवर त्याचा परिणाम दिसून येतो. खाद्यतेलाच्या किंमतीचा बऱ्याच क्षेत्रावर परिणाम होतो.
विदेशातून आयात करण्यात आलेल्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय तेल बाजारावर दिसून येतो. देशांतर्गत खाद्य तेल उत्पादनासाठी मोठा खर्च येतो. तर विदेशाची तेलाचे भाव धारशायी झाले आहे.
जर केंद्र सरकारने लवकरच हस्तेक्षेप केला नाही तर देशातील खाद्य तेल उद्योग आणि शेतीवर मोठा परिणाम होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. स्वस्तातील आयात तेलावर आयात कर लावण्याची मागणी करण्यात येत आहे. नाहीतर तेलबिया आणि तेलाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने खाद्य तेल उत्पादनात स्वयंपूर्णतेचा, आत्मनिर्भरतेचा नारा दिला आहे. पण आयात तेलाबाबत केंद्र सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासाठी आयात शुल्क वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.