नोकरदारांना फुकटात मिळते 7 लाखांची सुविधा, कधी आणि कसे पैसे मिळू शकतात?

ज्यांच पीएफ अकाऊंट आहे, त्या सर्व कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईज डिपॉजिट लिंक्ड इंश्योरेंस स्कीम, 1976 (EDLI) नुसार कव्हर मिळतं.

नोकरदारांना फुकटात मिळते 7 लाखांची सुविधा, कधी आणि कसे पैसे मिळू शकतात?
Rupee Note
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 12:18 PM

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सबस्क्रायबर्सना कर्मचारी भविष्य निधी (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजनेशिवाय (EPS) जीवन विमा अर्थात लाईफ इन्शुरन्सचा (Life Insurance) आणखी एक मोठा फायदा देते. ज्यांच पीएफ अकाऊंट आहे, त्या सर्व कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईज डिपॉजिट लिंक्ड इंश्योरेंस स्कीम, 1976 (EDLI) नुसार कव्हर मिळतं. EDLI नुसार प्रत्येक EPF खातेधारकाला 7 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा सुरक्षा अर्थात इन्शुरन्स कव्हर मिळतो. महत्वाचं म्हणजे या योजनेत कर्मचाऱ्यांना कोणताही हप्ता किंवा पैसे भरावे लागत नाही. ज्यांचा पीएफ कट होतो किंवा पीएफ अकाऊंट आहे, त्यांना हा लाभ आपोआपच मिळतो. (EDLI scheme for EPFO employee EPF account holder can claim 7 lakh after employee death due to corona)

जर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला, तर त्यांचे वारस या विमा रकमेवर दावा करु शकतात. पूर्वी या योजनेची मर्यादा 6 लाख होती ती गेल्यावर्षी सप्टेंबर 2020 मध्ये वाढवून 7 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली.

विमा रकमेवर कधी आणि कसा दावा करायचा?

जर पीएफ खातेधारकाचा नैसर्गिक किंवा अपघाती किंवा आजाराने मृत्यू झाला तर नातेवाईक विमा रकमेवर दावा करु शकतात. यामध्ये एकरकमी पैसे मिळतात. हे विमाकवच पीएफ खातेधारकाला मोफत मिळतं. त्यासाठी त्यांना कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही. पीएफ अकाऊंटसोबतच हे आपोआप लिंक होतं.

यासाठी विमा कंपनीला मृत्यू दाखला (Death certificate), वारस प्रमाणपत्र (succession certificate) आणि बँक डिटेल्स देण्याची आवश्यकता असेल. कोरोनामुळे (COVID-19) होणाऱ्या मृत्यूप्रकरणातही या रकमेवर नातेवाईक दावा करु शकतात. जर कोणी वारस नसेल तर कायदेशीर नातेवाईक या रकमेवर दावा करु शकतात.

PF खात्यातून पैसे काढण्यासाठी एम्प्लॉयर अर्थात तुमच्या कंपनीकडे जमा होणाऱ्या फॉर्मसह, विमा सुरक्षेचा फॉर्म (Insurance cover) 5 IF सुद्धा जमा करावा. हा फॉर्म कंपनीने व्हेरिफाय केल्यानंतर विमा सुरक्षेचं पैसे दिले जातात.

पीएफमध्ये किती रक्कम 

सध्या कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम त्याच्या पीएफ खात्यात जमा होते. कर्मचारी 12 टक्के आणि कंपनीही तेव्हढीच म्हणजे 12 टक्के रक्कम पीएफमध्ये जमा करते. कंपनी जी 12 टक्के रक्कम भरते त्यामध्ये 3.67 टक्के रक्कम EPF आणि 8.33 टक्के रक्कम EPS मध्ये जमा केली जाते.

कंपनीकडून EDLI मध्ये जमा केलेल्या रकमेच्या 0.5 टक्के रक्कमेनुसार पीपीएफ खातेधारकाच्या वारसाला 7 लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षा रक्कम मिळू शकते.

निवृत्तीनंतर दावा करु शकत नाही 

पीएफ खातेधारकांना हा लाभ केवळ नोकरीत असताना मिळतो, निवृत्तीनंतर विम्याच्या रकमेवर दावा करता येऊ शकता नाही.

संबंधित बातम्या 

Gold Price Today | मे महिन्यात सोने 1000 रुपयांनी महागले, गुंतवणुकीआधी जाणून घ्या ताजे दर

Paytm First Credit Card : पेटीएमचा धमाका, प्रत्येक व्यवहारावर 3 % कॅशबॅक, कार्डवर जबरदस्त फायदा 

(EDLI scheme for EPFO employee EPF account holder can claim 7 lakh after employee death due to corona)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.