सुशिक्षित बेरोजगाराचे अर्थमंत्र्यांना खुले पत्र
सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. काय आहेत सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या मागण्या जाणून घ्या सुशिक्षित बेरोजगाराचे अर्थमंत्र्यांना खुले पत्रात
माझे नाव संतोष आहे. मी लातूरचा राहणार आहे. माझं यंदा बीएससी पूर्ण झालंय . 8 ते 9 महिन्यांपासून मी नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहे. इंटरव्यू देण्यासाठी पुण्या,मुंबईपर्यंत जाऊन आले. मोबाईल एक बातमीत वाचलं होतं की तुम्ही बजेटसंदर्भात सूचना मागवल्या आहेत मग मीही माझी मन की बात मोबाईलवर लिहायला सुरूवात केली
मॅडम,
मॅडम, नोकरी नसल्यानं घरच्यांना तोंड दाखवायला जागा नाही. BSC नंतर नोकरी मिळवायला एवढं अवघड असेल वाटलं नव्हतं. इंजिनिअरिंग करण्याएवढे पैसे नव्हते म्हणून बीएससी केलंमाझे वडील एका खासगी कंपनीत सुपरवायझर आहेत. इंजिनिअरिंगची फीस कशी परवडणार म्हणून लातुरातच बीएससी केलं. मला नोकरी करायची आहे पण कुठं काम मिळत नाही. कमीत कमी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यापूर्वी काउंसलिंगची सोय करावी म्हणजे पदवीनंतर नोकरी मिळणार की नाही याबाबत तर किमान माहिती मिळते.
प्रत्येक वर्षी माझ्यासारखे हजारो पदवीधर बेरोजगारांची संख्या वाढवत आहेत….
पत्रातील पुढील मजकूर जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ :