Elon Musk: एलन मस्कचं एक ट्विट, बिटकॉईनच्या किमतीत हजारो डॉलर्सची घसरण, टेस्लाच्या प्रमुखानं काय म्हटलं?

एलन मस्क यांनी ट्विट करत टेस्ला कंपनीच्या कार बिटकॉईनद्वारे खरेदी करता येणार नाहीत, अशी माहिती दिली. Elon Musk Tesla Bitcoin

Elon Musk: एलन मस्कचं एक ट्विट, बिटकॉईनच्या किमतीत हजारो डॉलर्सची घसरण, टेस्लाच्या प्रमुखानं काय म्हटलं?
Bitcoin Elon Musk
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 1:46 PM

नवी दिल्ली: टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेसएक्स (SpaceX) या दोन बड्या कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांनी एक ट्विट केलं. या ट्विटनंतर बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीला मोठा फटका बसला. एलन मस्क यांच्या एका ट्विटनंतर बिटकॉईनचा मार्केटमधील भाव तब्बल 17 टक्क्यांनी घटला. गेल्या वर्षभरापासून बिटकॉईनचा भाव वाढत असताना त्यांच्यासाठी एलन मस्क यांचं ट्विट अडचणीचं ठरलं. एलन मस्क यांनी ट्विटमध्ये टेस्लाची कार खरेदी करण्यासाठी बिटकॉईनचा वापर करता येणार नाही, असं म्हटलं होतं. एलन मस्क यांच्या ट्विटपूर्वी क्रिप्टोकरन्सीचा भाव 54 हजार 819 अमेरिकन डॉलर होता. तो 45700 अमेरिकन डॉलरवर आला. (Elon Musk announced Tesla not accept Bitcoin cryptocurrency then Bitcoin market value declined by 17 percent)

एलन मस्क यांचं ट्विट नेमकं काय?

एलन मस्क यांनी ट्विट करत टेस्ला कंपनीच्या कार बिटकॉईनद्वारे खरेदी करता येणार नाहीत, अशी माहिती दिली. यामध्ये त्यांनी बिटकॉईन मायनिंग आणि त्यासंबंधी जीवाश्म इंधनाच्या वाढत्या वापरामुळं चिंतेत असल्याचं सांगितलं. बिटकॉईन ही चांगली संकल्पना आहे. मात्र, पर्यावरणाला नुकसान पोहोचवायला नको, असं एलन मस्क यांनी म्हटलं आहे.

एलन मस्क यांचं ट्विट आणि 15 क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण

एलन मस्क यांच्या ट्विटपूर्वी बिटकॉईनच्या एका क्रिप्टोकरन्सीचा भाव 54 हजार 819 अमेरिकन डॉलर होता. भारतीय चलनात त्याची किंमत 40 लाख 36 हजार 48 रुपये होते. एलन मस्क यांच्या ट्विटनंतर 45700 अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात तो भाव 33 लाख 64 हजार 662 रुपयांवर आला. आला. 1 मार्च नंतर पहिल्यांदा बिटकॉईनचा भाव या पातळीवर आला आहे. एलन मस्क यांच्या ट्विटनंतर अवघ्या दोन तासांमध्ये बिटकॉईनच्या भावामध्ये 9119 अमेरिकन डॉलरची घसरण झाली. कॉईनडेस्कच्या अहवालानुसार केवळ बिटकॉईन नव्हे तर इतर 15 क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण पाहायला मिळाली.

एलन मस्क यांच्यामुळे यापूर्वी बिटकाईनमध्ये 14 टक्के वाढ

एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं बिटकॉईनचा वापर करुन कार खरेदी करता येईल, अशी घोषणा 8 फेब्रुवारीला केली होती. त्यावेळी बिटकॉईनच्या भावात 14 टक्के वाढ झाली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या ट्रेजरी फंडमध्ये 1.5 अब्ज डॉलर बिटकॉईन ठेवेल, असं म्हटलं होतं.

संबंधित बातम्या:

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताय, कोरोना काळात ‘या’ कंपनीत गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडलेत

Tesla ची कार खरेदी करण्यासाठी पैसे नको Bitcoin द्या; एका Bitcoin ची किंमत माहितीय?

(Elon Musk announced Tesla not accept Bitcoin cryptocurrency then Bitcoin market value declined by 17 percent)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.