Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk पुन्हा श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर; Mark Zuckerberg ला टाकले मागे

Elon Musk World Richest : Mark Zuckerberg यांच्या संपत्तीत गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण झाली आहे. 18 अब्ज डॉलरचा फटका, मेटाचा स्टॉक घसरल्याने बसला आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार, आता एलॉन मस्क यांनी श्रीमंतांच्या यादीत् आघाडी घेतली आहे.

Elon Musk पुन्हा श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर; Mark Zuckerberg ला टाकले मागे
मस्कची झुकरबर्गला टशन
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 10:04 AM

गेल्या काही दिवसांपासून जागतिक अब्जाधीश आणि टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. टेस्लाच्या शेअरमध्ये घसरणीचा त्याला मोठा फटक बसला. त्यामुळे तो जागतिक श्रीमंतांच्या यादीत दूर फेकला गेला. आता त्याच्यासाठी एक आनंदवर्ता धडकली आहे. त्याचा प्रतिस्पर्धी मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग याला मोठा फटका बसला आहे. मेटाचा शेअर घसरल्याने मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. त्याला 18 अब्ज डॉलरचा फटका बसला. या अपडेटमुळे एलॉन मस्क श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्समध्ये त्याने आघाडी घेतली आहे.

मेटाचा शेअर 11 टक्के घसरला

फेसबुकची मूळ कंपनी Meta चा शेअर गुरुवारी बाजारात 11 ट्क्क्यांनी घसरला. दुसऱ्या तिमाहीत कंपनीची विक्री कमी झाल्याचे समोर येताच शेअरने निच्चांकाकडे धाव घेतली. Bloomberg Billionaires Index नुसार, या पडझडीमुळे झुकरबर्गच्या संपत्तीत एकाच दिवसात मोठी घसरण झाली. त्याचा त्याला फटका बसला तर श्रीमंतांच्या यादीत समोर येण्यास एलॉन मस्क याला बळ मिळाले.

हे सुद्धा वाचा

टेस्लाची घौडदौड

गेल्या काही दिवसांपासून टेस्लाचा शेअर बाजारात फिक्का पडला होता. त्याच्यावर घसरणीचे मळभ होते. पण टेस्ला कंपनीने नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले. त्यानंतर कंपनीचा शेअर घौडदौड करत आहे. त्यामुळे मस्क याच्या संपत्तीत 5.8 दशलक्ष डॉलरची भर पडली. त्याच्याकडे एकूण 184 दशलक्ष डॉलरची संपत्ती झाली. टेस्लाचा शेअर बाजारात चांगली कामगिरी करत आहे.

गेल्या महिन्यात मस्क याला झुकरबर्गने टाकले होते मागे

दोन्ही दिग्गजांमध्ये श्रीमंतांच्या यादीत चढाओढ सुरु आहे. दोघांचे या काळात यादीतील स्थान बदलले होते. 2020 नंतर पहिल्यांदा मोठा उलटफेर होत, झुकरबर्गने मस्क याला श्रीमतांच्या यादीत मागे टाकले होते. टेस्लाच्या कार बाजारात न उतरल्याने, उशीरा बाजारात येत असल्याने त्याचा परिणाम टेस्लाच्या शेअरवर दिसून आला होता. तर गुरुवारी ऑक्टोबर 2022 नंतर मेटाचा शेअर सर्वाधिक आपटला. वॉल स्ट्रीटमधील गुंतवणूकदारांच्या अपेक्षावर हा कंपनी खरी न उतरल्याने हा फटका बसला. त्यामुळे झुकरबर्ग याच्या संपत्तीत कमाल घसरण दिसून आली.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.