Home Loan, कार लोनचा EMI कधी होणार कमी? आली ही अंतिम तारीख

EMI | गेल्या दोन वर्षाांपासून ईएमआय कमी होण्याची प्रतिक्षा करणाऱ्या लोकांसाठी आनंदवार्ता आली आहे. कर्जावरील हप्ता कधी कमी होईल, याची अनेक जण वाट पाहत आहेत. जगभरातच नाही तर भारतात पण महागाई कमी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, काय आहे नेमकी अपडेट?

Home Loan, कार लोनचा EMI कधी होणार कमी? आली ही अंतिम तारीख
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 3:25 PM

नवी दिल्ली | 14 February 2024 : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एका वर्षात रेपो दरात कुठलाच बदल केलेला नाही. तर मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान पॉलिसी दरात 250 बीपीएस वाढ झाली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जासह इतर कर्ज महागले. ग्राहकांना अधिक दराने व्याज चुकवावे लागत आहे. एकीकडे महागाईचा मार आणि दुसरीकडे वाढलेला ईएमआय या दोघात ग्राहक होरपळला. पण आता कर्जदारांसाठी आनंदवार्ता आली आहे. घाऊक महागाई कमी झाली आहे. त्यामुळे रेपो दरात कपातीची आशा वाढली आहे. जगभरातच नाही तर भारतात पण महागाई कमी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता लवकरच कमी होण्याचा अंदाज आहे, काय आहे नेमकी अपडेट?

कर्जावरील ईएमआय होईल कमी

भारतीय रिझर्व्ह बँकेने एक वर्षापासून रेपो दरात काहीच बदल केलेला नाही. तर जगभरात पण महागाई दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सध्या जगात दोन युद्ध सुरु आहेत. हे युद्ध जर लवकर आटोक्यात आली तर मोठा फरक पडेल. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिजच्या रिपोर्टनुसार, आरबीआय आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटमध्ये याविषयी निर्णय घेईल. त्यानंतर तिसऱ्या तिमाहीत रेपो दरात कपात होईल. म्हणजे या वर्षाच्या अखेरीस ईएमआय कपातीला सुरुवात होईल.

हे सुद्धा वाचा

किरकोळ महागाई आली टप्प्यात

या जानेवारीत CPI महागाई, किरकोळ महागाई केंद्रीय बँकेच्या अपेक्षेनुसार 5.1 टक्क्यांपर्यंत उतरली आहे. तर घाऊक महागाईने पण दिलासा दिला आहे. सर्वात अगोदर भाजीपाला, त्यानंतर फळं, मसाले, डाळी, तेल आणि इतर भावात घसरण आली आहे. दरम्यान जानेवारीत धान्य, मांस आणि मासे, अंड्यांच्या किंमतीत वाढ झाली. गेल्या काही महिन्यांपासून घाऊक महागाईत वाढ दिसून आली. यंदा लहरी हवामानाचा मोठा परिणाम किंमतींवर दिसून येत आहे. महागाई घसरल्याने रेपो दरात कपातीचा मार्ग मोकळा होत आहे.

तिसऱ्या तिमाहीत येणार आनंदवार्ता

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिजच्या रिपोर्टनुसार, यंदाच रेपो दरात कपात होईल. आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत खाद्य किंमती कमी होईल. अमेरिकन केंद्रीय बँक सुद्धा दरात कपातीचे धोरण सुरु ठेवण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक वर्ष 24 च्या दुसऱ्या सहामाहीत त्याचा परिणाम दिसेल. आरबीआयच्या आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस बदल दिसून येईल. आता किती कपात होईल, हे सांगणे कठिण आहे. पण ईएमआय कमी होण्याची दाट शक्यता आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.