पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; कोणत्या पण बँकेतून काढा Pension ची रक्कम; कधीपासून लागू होणार हा नियम

Employee Pension Scheme : देशातील पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता त्यांना कोणत्याही बँकेतून आणि कुठून पण निवृत्ती रक्कम काढता येणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 78 लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा फायदा होईल.

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; कोणत्या पण बँकेतून काढा Pension ची रक्कम; कधीपासून लागू होणार हा नियम
निवृत्तीधारकांसाठी मोठी बातमी
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 4:31 PM

कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतंर्गत (Employee Pension Scheme) पेन्शन मिळणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. 1 जानेवारी 2025 पासून या पेन्शनर्संना देशातील कोणत्याही भागातील कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येईल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी ही माहिती दिली आहे. या निर्णयाचा 78 लाखांहून अधिक ईपीएस पेन्शनधारकांना फायदा होईल.

केंद्रीकृत प्रणाली तयार

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याविषयी एक माहिती दिली. त्यानुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालय, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज, ईपीएफचे अध्यक्ष यांनी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना, 1995 अंतर्गत केंद्रीकृत प्रणाली तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. राष्ट्रीय स्तरावर केंद्रीकृत प्रणाली तयार झाल्याने भारतातील कोणत्याही भागातील बँकेच्या शाखेतून निवृत्ती वेतनधारकांना पेन्शन काढता येईल. या Centralized Pension Payment System मुळे EPFO च्या 78 लाख ईपीएस पेन्शनर्सला फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

ईपीएफओच्या आधुनिकीकरणाची कास

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा निर्णय घेऊन ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. केंद्रीकृत प्रणाली ईपीएफओच्या आधुनिकि‍करणासाठी मैलाचा दगड ठरेल. देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून तो त्याची पेन्शनची रक्कम काढू शकणार आहे. त्यामुळे त्याला पेन्शनसाठी ठराविक एका बँकेत ताटकाळत राहावं लागणार नाही.

असा होईल बदल

केंद्रीकृत प्रणालीद्वारे देशातील निवृत्ती वेतन वितरणाला मोठी मदत मिळेल. त्यासाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर (Pension Payment Orders) हस्तांतरीत करण्याची गरज उरणार नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बँक अथवा शाखा बदलल्यावर यापूर्वी पेन्शन ऑर्डर द्यावी लागत होती. निवृत्ती नंतर अनेक निवृत्ती वेतनधारक त्यांच्या मूळ गावी गेल्यावर त्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. ती अडचण आता दूर होणार आहे. केंद्रीकृत प्रणाली आता आधार पेमेंट सिस्टमवर आधारीत करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शनर त्याची पेन्शनची रक्कम काढू शकणार आहे. त्यामुळे त्याला पेन्शनसाठी ठराविक एका बँकेत ताटकाळत राहावं लागणार नाही.

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.