Enforcement Directorate | बस नाम ही काफी है, ईडी पीडा टळो म्हणून अनेकांचे देव पाण्यात! जप्त संपत्तीचे आकडे बघाल तर…

Enforcement Directorate | गेल्या काही वर्षांत ईडी, सक्तवसुली संचालनालय भारताची सर्वात शक्तिशाली तपास संस्था कशी बनली? ईडीने जप्त केलेल्या संपत्तीचे आकडे माहिती आहेत का? चला तर जाणून घेऊयात

Enforcement Directorate | बस नाम ही काफी है, ईडी पीडा टळो म्हणून अनेकांचे देव पाण्यात! जप्त संपत्तीचे आकडे बघाल तर...
शक्तीशाली यंत्रणाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 11:01 AM

Enforcement Directorate | गेल्या काही वर्षांत Enforcement Directorate (ED) सक्तवसुली संचालनालयाची सक्रियता खूप वाढली आहे. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) ही याला दुजोरा दिला आहे. मंत्रालयाने 2020-21 च्या वार्षिक अहवालात याविषयीची आकडेवारी स्पष्ट केली आहे. गुणवत्ता आणि प्रमाण या दोन्ही बाबतीत ईडीचे काम गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढल्याचे म्हटले आहे. या 1 ऑगस्ट रोजी ईडीने शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना अटक केली. ईडीच्या आडून सरकार विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत असो असून सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतू, आकडेवारीवरुन निदान हे स्पष्ट होत आहे की, ईडी गेल्या काही वर्षात प्रचंड सक्रीय झाली असून मागील 14 वर्षांतील कारवाईपेक्षा गेल्या तीनच वर्षात ईडीने आक्रमकपणे कारवाई केल्याचे आकड्यांवरुन स्पष्ट होते. दस्तुरखूद्द सरकारनेच (Central Government) याविषयीची आकेडवारी संसदेत ((Parliament) सादर केली आहे. त्यामुळे ईडी गेल्या पाच वर्षांत सर्वच सरकारी तपास यंत्रणातील शक्तीशाली तपास यंत्रणा (Powerful Investigating Agency) ठरली आहे.

ईडीचा या क्षेत्रात दणका

सरकारने गुणवत्ता आणि प्रमाण या दोन्ही बाबतीत ईडीचे काम गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढल्याचे म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाने खुलासा केल्यानुसार, अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांची अशात मोठ्या प्रमाणात चौकशी आणि तपास सुरु आहे. मुख्यतः दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवणे, मानवी तस्करीसाठीचा निधी, बँक फसवणूक , भ्रष्टाचार आणि अन्य अनेक फसवणुकीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने सकारात्मक आणि गुणवत्तापूर्वक काम केल्याची पुश्ती सरकारने जोडली आहे.

हे सुद्धा वाचा

ईडीचा इतिहास

सक्तवसुली संचालनालयाची स्थापना 1956 साली झाली होती. ही सरकारची कायदेशीर सक्त वसुली संचालनालयाची तपास यंत्रणा आहे. मनी लॉड्रिंग कायदा (PMLA,2002), फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA,1999) आणि फ्युगिटिव इकॉनॉमिक ऑफिंडर्स अॅक्ट(FEOA,2018) अंतर्गत ही संस्था दोषींविरोधात कारवाई करते. अनेक हाय प्रोफाईल प्रकरणात ईडीने सीबीआयची जागा घेतल्याचे अनेक उदाहरणांवरुन स्पष्ट होत आहे.

कारवाईचे आकडे धडकी भरवणारे

मनीकंट्रोलने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन आर्थिक वर्षांत ईडीने पीएमएलए अंतर्गत 2,723 एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट (ECIR) दाखल केले आहेत. गेल्या 14 वर्षांत एकूण 2,699 खटले दाखल केले होते. त्या तुलनेत तीन वर्षांची आकडेवारी जास्त आहे.

तर गेल्या तीन वर्षांत ईडीने फेमाअंतर्गत 11,420 प्रकरणांत तपास सुरू केला आहे. त्या आधी पाच वर्षांत केवळ 720 प्रकरणांत तपास सुरु होता. त्यामुळे सहाजिकच प्रश्न उभा ठाकतो की ही एजन्सी अचानक एवढी सक्रिय कशी झाली?

एवढी संपत्ती केली जप्त

फेमा अंतर्गत प्रकरणांची संख्या कमी आहे. 2004-05 आणि 2013-14 या काळात ‘फेमा’अंतर्गत ‘ईडी’ने केवळ 14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली, तर 1754 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, पुढील काही वर्षांत या आकडेवारीत वाढ झाली. केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर 2014-15 ते 2021-2022 या कालावधीत दंडाची रक्कम 6 हजार 377 कोटी रुपयांवर पोहचली, तर 7 हजार 66 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

गेल्या महिन्यात एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, 2004-05 ते 2013-14 या कालावधीत ईडीने पीएमएलए अंतर्गत 5,346 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 2014-15 ते 2021-22 या कालावधीत 99 कोटी 356 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.