नोकरीवर असताना EPF मधून पैसे काढायचे आहेत? मग जाणून घ्या इत्यंभूत माहिती
भविष्य निर्वाह निधीचा वापर करायचा असेल तर त्यासाठी सरकारने काही अटी ठेवलेल्या आहेत. (epf withdrawal rules)
मुंबई : वृद्धापकाळातील महत्त्वाच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ची तरतूद केली. मात्र, नोकरीवर रुजू असतानाही या निधीचा वापर करता येतो. अत्यावश्यक आणि विशेष बाबींसाठी या निधीच्या वापराची सरकारने सुविधा केलेली आहे. नोकरीवर असताना विशेष गरजेसाठी जर हा निधी वापरला तर त्यासाठी कोणतेही व्याज वा दंड आकारला जात नाही. (epf withdrawal rules for employees who are on duty)
भविष्य निर्वाह निधीचा वापर करायचा असेल तर त्यासाठी सरकारने काही अटी घातलेल्या आहेत. या अटींअर्गत घऱ विकत घेण्यासाठी, आरोग्यविषयक गरज, गृहकर्ज, लग्न, शिक्षण अशा महत्त्वाच्या गोष्टींसाठी कर्मचाऱ्यांना या निधीचा वापर करता येतो. भविष्य निर्वाह निधी कार्यालय (EPFO) या कामांसाठी या निधीच्या वापराची परवानगी देते. वरती दिलेल्या बाबींसाठी ईपीएफचा उपयोग करता येत असला तरी त्यासाठी प्रत्येक बाबीसाठी वेगवेगळे नियम आहेत. तसेच, बतावणी करुन जर ईपीएफनिधी वापरला तर दंड म्हणून ईपीएफओ कार्यालयाकडून निधी वसुली केली जाऊ शकते.
बेरोजगार असाल तर 75 टक्के निधी काढण्यास मूभा
निवृत्ती अगोदर तुम्हाला भविष्य निर्वाह निधी काढायचा असेल तर नियमानुसार 54 वर्षांनतर तसेच, निवृत्तीच्या 1 वर्षाआधी ईपीएफमधील 90 टक्के निधी काढता येतो. तसेच, एखादा कर्मचारी एक महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार असेल तर त्याला ईपीएफमधील 75 टक्के रक्कम काढता येते. तसेच 2 महिन्यांपेक्षा जास्त दिवस बेरोजगार असल्यास ईपीएफ मधील 25 टक्के रक्कम काढता येतो.
नवे घर, जमीन खरेदी
तसेच, एखादा कर्मचारी नवे घर किंवा नवी जमीन खरेदी करत असेल तर तो या ईपीएफ निधीचा उपोग करु शकतो. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ईपीएफओने अनेक अटी ठेवलेल्या आहेत. एखादा कर्माचारी सरकारी एजन्सीकूडन घर खरेदी करत अलेल तर ईपीएओ ऑफीस या प्रक्रियेला एजन्सीकडून घऱ खरेदी करण्यात येत आहे, असे गृहीत धरेल. तसेच, कर्मचारी एखाद्या बिल्डरकूडन घर विकत घेत असेल तर, 36 महिन्यांचा बेसिक पगार आणि महगाई भत्ता किंवा कर्मचारी आणि काम करत असेलेल्या संस्थेकडून दिली जाणारी व्याजासह रक्कम किंवा खर खरेदीची किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढी रक्कम ईपीएफ निधी मधून काढता येईल. यासाठी 5 वर्षांपर्यंत ईपीएफ निधी जमा झालेला असायला हवा.
जागा खरेदी
जनमी खरेदी करायची असेल तर 24 महिन्यांचा बेसिक पगार आणि महागाई भत्ता किंवा कर्मचारी आणि काम करत असलेल्या संस्थेकडून दिली जाणारी व्याजासह रक्कम, या दोन्हींपैकी जी रक्कम कमी असेल, ती रक्कम ईपीएफमधून काढता येते. त्यासाठी कमीतकमी 5 वर्षे ईपीएफ जमा झालेला असावा.
संबंधित बातम्या :
कोट्यवधी शेतकरी अर्ज करुनही PM Kisan Scheme पासून वंचित, आता काय करायचं?
(epf withdrawal rules for employees who are on duty)