EPFO Investment | ETF मधील गुंतवणुकीतून ईपीएफओ मालामाल, आकडे पाहताच तुम्ही म्हणाल मान गये उस्ताद!

EPFO Investment | ETF मधील गुंतवणुकीतून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मालामाल झाली आहे. ईपीएफओने केलेली कमाई पाहून तुम्ही ही म्हणाला वा भाई वा, काय कमाल केली.

EPFO Investment | ETF मधील गुंतवणुकीतून ईपीएफओ मालामाल, आकडे पाहताच तुम्ही म्हणाल मान गये उस्ताद!
ईपीएफओ मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 4:43 PM

EPFO Investment | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) केवळ कर्मचाऱ्यांचे योगदान जमा करुन त्यावर व्याज देण्याचेच काम करत नाही. तर संघटना गुंतवणूक ही करते. ईपीएफओ वेगवेगळ्या माध्यमांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून (Investment) उत्पन्न मिळवते. त्यातून संघटना दरवर्षी आपल्या सदस्यांना परतावा देते. गेल्या काही वर्षांत शेअर बाजार, विशेषत: एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ETF) हे ‘ईपीएफओ’चे पसंतीचे माध्यम म्हणून पुढे आले आहे. सरकारने या संदर्भातील ताजी आकडेवारी संसदेत (Parliament) सादर केली आहे. त्यातून ही बाब उघड झाली आहे. ईपीएफओने ऑगस्ट 2015 पासून ईटीएफमध्ये पैसे गुंतविण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला ईपीएफओने ईटीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा आपल्या एकूण गुंतवणूकक्षम ठेवींच्या 5 टक्के इतकी निश्चित केली होती. पुढे ईपीएफओने 2016-17 मध्ये ही मर्यादा 10 टक्क्यांपर्यंत वाढवली. आता संघटनेने ईटीएफमध्ये 15 टक्के गुंतवणूक केली आहे.

ईटीएफमधील गुंतवणुकीवरील हा परतावा

ईपीएफओने यावर्षी मार्चपर्यंत ईटीएफमध्ये 1,59,299.46 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सोमवारी संसदेत दिली. ईपीएफओच्या ईटीएफमधील या गुंतवणुकीचे काल्पनिक बाजारमूल्य वाढून 2,26,919.18 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच ईपीएफओला ईटीएफकडून 42.44 टक्के परतावा मिळाला असून आतापर्यंत 67,619.72 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

हे सुद्धा वाचा

2015 मध्ये सुरू झाली ईटीएफमध्ये गुंतवणूक

ईपीएफओने ऑगस्ट 2015 पासून ईटीएफमध्ये पैसे गुंतविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ईपीएफओने ईटीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा आपल्या एकूण गुंतवणूकक्षम ठेवींच्या 5 टक्के इतकी निश्चित केली होती. त्यानंतर ईपीएफओने 2016-17 मध्ये ही मर्यादा 10 टक्क्यांपर्यंत वाढवली. यानंतर 2017-18 मध्ये ही मर्यादा पुन्हा वाढवून 15 टक्के करण्यात आली.

एप्रिल-जून दरम्यान इतके पैसे गुंतवले

लोकसभेत मंत्री रामेश्वर तेली यांनी याविषयीच्या एका प्रश्नाला लेखी उत्तर दिले. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत ईपीएफओने ईटीएफमध्ये 12,199.26 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी या काळात ‘ईपीएफओ’ची डेट आणि इक्विटीमध्ये एकूण गुंतवणूक 84,477.67 कोटी रुपये होती. ईपीएफओने 2021-22 मध्ये ईटीएफमध्ये 43,568.02 कोटी रुपये, 2020-21 मध्ये 32,070.84 कोटी रुपये आणि 2019-20 मध्ये 31,501,09 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहरे.

ईपीएफओची गुंतवणूक

ईपीएफओने ऑगस्ट 2015 ते मार्च 2022 या कालावधीत ईटीएफमध्ये एकूण 1,59,299.46 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, जी आता वाढून 2,26,919.18 कोटी रुपये झाली आहे. सध्या ईपीएफओ आपल्या गुंतवणुकीयोग्य निधीपैकी 85 टक्के रक्कम डेटमध्ये गुंतवते, तर उर्वरित 15 टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवत आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, ईपीएफओची ईटीएफमधील गुंतवणूक निफ्टी 50, बीएसई सेन्सेक्स, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइझ मध्ये करत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.