नोकरदारांसाठी मोठी बातमी, EPFO कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ खात्यात पाठवणार पैसे
EPFO कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2019-20 वर्षासाठी 8.50 टक्के व्याजाची रक्कम जमा केली जाऊ शकते. (EPFO likely to credit interest on EPF )
नवी दिल्ली: नोकरदारांना डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत EPFO कडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2019-20 वर्षासाठी 8.50 टक्के व्याजाची रक्कम जमा केली जाऊ शकते. सप्टेंबर महिन्यात कर्मचारी भविष्य निधी संघटनेने केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत व्याजाची रक्कम दोन भागात विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार 8.50 टक्के व्याजापैकी 8.15 टक्के पहिल्या टप्प्यात आणि 0.35 टक्के रक्कम दुसऱ्या टप्प्यात देण्यात येईल. (EPFO likely to credit interest on EPF account till end of December.)
पीटीआय या वृत्तसंस्थेला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या सुरुवातील श्रम मंत्रालयाने वित्त मंत्रालयला 2019-20 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफवरील व्याज दर 8.50 टक्के कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. श्रम मंत्रालयाच्या प्रस्तावावर वित्त मंत्रालयानं उत्तर दिलेलं नाही. पुढील एका आठवड्यात वित्त मंत्रालयाकडून श्रम मंत्रालयाच्या प्रस्तावावर निर्णय येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (EPFO likely to credit interest on EPF account till end of December.)
मार्च महिन्यात व्याजदराची घोषणा
वित्त मंत्रालयानं मागील वर्षाच्या व्याजदराबाबत स्पष्टीकरण मागितले होते. वित्त मंत्रालयाला यानंतर स्पष्टीकरण देण्यात आले होते. श्रममंत्री संतोष गंगवार यांनी EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत ईपीएफच्या रकमेवर 8.5 टक्के व्याज देण्याची घोषणा मार्च महिन्यात केली होती.
ईपीएफओने 2019 मध्ये 8.65 टक्के व्याजदर घोषित केला होता. ईपीएफवर 2020 मध्ये 8.5 टक्के व्याज देण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या 7 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या परिणामांमुळे व्याजदर 8.5 टक्के ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.(EPFO likely to credit interest on EPF account till end of December.)
वित्त मंत्रालायनं मंजुरी दिल्यास ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याआधी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) ने कोविडमुळे बाजार घसरल्यामुळे सेवानिवृत्ती फंड आपली इक्विटी गुंतवणूकी कमी करू शकत नसल्याने पहिल्यांदाच ईपीएफओ दोन हप्त्यांमध्ये व्याज जमा करणार अशी घोषणा केली होती. यावेळी ईपीएफओने 8.15 टक्के व्याज (कर्ज गुंतवणूकीतून मिळविलेले नफा) ताबडतोब जमा केलं जावं असं ठरवण्यात आलं होतं.
नितीन गडकरींचा भारतीय उद्योगांना चीनकडून आयात कमी करण्याचा मंत्र#nitingadkari #china #business #ficci @nitin_gadkari https://t.co/zQGYK3ZHRq
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2020
संबंधित बातम्या:
पैशाला पैसा जोडून मिळवा बक्कळ पैसा, ‘या’ 5 पद्धतीने करा गुंतवणूक
महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचा परवाना रद्द, ग्राहकांना कसे मिळणार पैसे परत?
(EPFO likely to credit interest on EPF account till end of December.)