EPFO : PF खात्यात दिवाळीनंतर जमा होणार व्याज, सोप्या पद्धतीने तपासा खात्यातील रक्कम

EPFO : PF खात्यात दिवाळीनंतर व्याज जमा होणार आहे, मग खात्यातील शिल्लक रक्कम कशी तपासाल.

EPFO : PF खात्यात दिवाळीनंतर जमा होणार व्याज, सोप्या पद्धतीने तपासा खात्यातील रक्कम
दिवाळीनंतर येईल पैसाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 8:40 PM

नवी दिल्ली : नोकरदारांसाठी (Serviceman) दिवाळीचा (Diwali) आनंद द्विगुणित करणारी बातमी आहे. त्यांना याचा फायदा या दिवाळीत मिळणार नाही. तर दिवाळीनंतर मिळेल. केंद्र सरकार (Central Government) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) खात्यात लवकरच व्याजाची रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. अर्थात EPFO ने याविषयीची अधिकृत माहिती दिलेली नाही.

पीएफ खात्यात किती रक्कम जमा करण्यात येईल, हे कसं ठरवणार? तर सरकार यंदा EPF वर 8.1 टक्के व्याज देणार आहे. व्याजाचा दर सरकारने यापूर्वीच जाहीर केलेला आहे. ऑगस्ट महिन्यापासून नोकरदार व्याजाच्या प्रतिक्षेत आहेत.

तुमच्या खात्यात किती रक्कम आहे, त्यावर व्याजदराने व्याजाची रक्कम जमा होईल. समजा एखाद्याच्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा आहेत. तर त्याला या रक्कमेवर 8.1 टक्के व्याज दराने 8,100 रुपये मिळतील.

हे सुद्धा वाचा

पीएफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन माहिती करुन घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल.

तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.

तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

उमंग अॅपवरुनही तुम्हाला EPFO खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती मिळू शकते. त्यासाठी अॅपमध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकावरुन लॉग इन करा आणि EPFO ​​पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासता येईल.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.