भारताचा पहिला दणका, पाक ‘डर्टी मनी ब्लॅकलिस्ट’मध्ये, युरोपीयन युनियनची घोषणा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात भारताचे 37 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहोम्मदने स्वीकारली. यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला बहिष्कृत करणार असे सांगितले. पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकाकी पाडण्याची सरकारच्या योजनेला आता जगभरातील देशांचा पाठिंबा मिळतो आहे. अनेक देशांना पाकिस्तानसोबतचे व्यावसायिक संबंध संपवण्याचा इशारा दिला आहे. पुलवामा […]

भारताचा पहिला दणका, पाक 'डर्टी मनी ब्लॅकलिस्ट'मध्ये, युरोपीयन युनियनची घोषणा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात भारताचे 37 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहोम्मदने स्वीकारली. यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला बहिष्कृत करणार असे सांगितले. पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकाकी पाडण्याची सरकारच्या योजनेला आता जगभरातील देशांचा पाठिंबा मिळतो आहे. अनेक देशांना पाकिस्तानसोबतचे व्यावसायिक संबंध संपवण्याचा इशारा दिला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा भारताने रद्द केला आहे. त्यानंतर आता दहशतवाद्यांना फंडिंग करणे आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांत पाकिस्तानचा हात असल्याने त्याला ‘डर्टी मनी ब्लॅकलिस्ट’ च्या यादीत टाकण्यात आले आहे. युरोपीयन देशांची संघटना युरोपीयन युनियनने पाकिस्तानला या यादीत टाकले आहे. या यादीत इतर काही देशांचाही समावेश आहे. पाकिस्तानचा समावेश या यादीत झाल्यानंतर या ‘डर्टी मनी ब्लॅकलिस्ट’मधील देशांची संख्या 23 वर आली आहे.

युरोपीयन युनियन कमीशन बँकांची फसवणूक करणे, मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याच्या आरोपाखाली पाकिस्तान आणि सौदी-अरबसह अनेक देशांना ब्लॅकलिस्ट केले आहे. यात अमेरिकेचेही चार क्षेत्र आहेत. युरोपीयन युनियन आयोग ज्यांचा या यादीत समावेश करते त्या देशांशी युरोपीय देश व्यावसायिक संबंध रद्द करतात.

पाकिस्तानशिवाय या यादीत अफगानिस्तान, दक्षिण कोरिया, इथियोपिया, इराण, श्रीलंका, सीरिया, त्रिनिदाद अँड टोबॅगो, ट्यूनिशिया, येमेन, लीबिया, बोत्सवाना, घाना आणि बहामास इत्यादी देश आहेत.

वाचा : माय फ्रेंड मोदी, आय अॅम विथ यू, इस्रायलच्या पंतप्रधानांचा जाहीर पाठिंबा

पाकिस्तानवर काय परिणाम होणार ?

व्यावसायिक संबंध रद्द करण्यासोबतच ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या देशांवर अनेक निर्बंध लादण्यात येतात. यामुळे पाकिस्तानच्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यात अनेक अडचणी उद्धवू शकतात.

या यादीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. युरोपीयन युनियन आयुक्त वेरा जुरोवाने यांनी प्रस्ताव मांडला आहे. युरोपीयन युनियन कमीशनमध्ये 28 देशांचे सदस्य आहेत. ते या प्रस्तावाला बहुमताने नाकारु शकतात. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. मनी लाँड्रिंगमुळे बँकिंग क्षेत्राला धोका आहे, त्यामुळे या समितीचे सर्व सदस्य हा प्रस्ताव मान्य करतील असे आयुक्त वेरा जुरोवा यांचे मत आहे.

युरोपीयन युनियन कमीशनच्या सदस्यांनी जर हा प्रस्ताव मान्य केला तर पाकिस्तानला व्यावसायिकदृष्ट्या मोठे नुकसान होऊ शकते.

वाचा : पुलवामा हल्ल्यानंतर मोदींकडून पाकिस्तानला 10 इशारे

पुलवामा हल्ला :

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने सुसाईट बॉम्बर बनून हा आत्मघाती हल्ला केला.

संबंधित बातम्या :

घरात दीड वर्षांचा अपंग मुलगा, म्हातारा बाप… 26 वर्षीय रमेश यादव शहीद!

ना युद्ध, ना लढाई, हे शस्त्र वापरून पाकिस्तानला गुडघे टेकायला लावा

Pulwama Attack: माझा शब्द आहे, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ : मोदी

Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?

गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले

VIDEO : 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.