RBI ने केली निराशा; तरीही कमी करु शकता बरं गृहकर्जावरील हप्ता

Home Loan EMI : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) रेपो रेटमध्ये कपात करण्याची मोठी आशा होती. पण ग्राहकांच्या या इच्छेवर पाणी फेरले गेले. ग्राहकांना गृहकर्जाचा हप्ता कमी होईल, असे वाटले, तसे झाले नाही. पण यापद्धतीने तुमचा व्याजाचा हप्ता कमी करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.

RBI ने केली निराशा; तरीही कमी करु शकता बरं गृहकर्जावरील हप्ता
गृहकर्जाचा हप्ता असा होईल कमी
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 10:19 AM

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या निर्णयाकडे काल संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागले होते. पण आरबीआयने रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे ईएमआय कमी होऊन दिलासा मिळण्याची ग्राहकांची आशा धुसर झाली. पतधोरण समितीने रेपो दर जैसे थे ठेवले. ईएमआयमध्ये आता कुठलाच बदल होणार नाही. अशावेळी कर्जाचा हप्ता कमी करण्याच्या प्रयत्न तुम्ही करु शकता, त्यासाठी या टिप्स उपयोगी पडू शकतात.

रेपो दर जैसे थे

एका वर्षापूर्वी रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर रेपो दरात वाढ झालेली नाही. 5 एप्रिल रोजी रेपो दर सातव्यांदा कायम ठेवण्यात आला. रेपो दराआधारेच बँका गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याज निश्चित करते.

हे सुद्धा वाचा

EMI कमी करण्यासाठी पद्धत

तुम्हाल गृहकर्जावरील व्याज कमी करण्यासाठी या काही टिप्स उपयोगी पडतील.

  1. तुमचा सिबिल स्कोर जोरदार असेल तर तुम्ही तुमच्या बँकेकडे गृहकर्जावरील व्याज दर कमी करण्यासाठी प्रयत्न करु शकता. तुमचा सिबिल स्कोर वेळेप्रमाणे चांगला झाला तर तुमच्या गृहकर्जावरील व्याज दर कपातीसाठी तुम्ही बँकेसोबत घासघीश करु शकता. बँक व्यवस्थापकडे याविषयीचे अधिकार असतात.
  2. तुमचे गृहकर्ज कमी करायचे असेल तर ते फ्लोटिंग व्याजदरावर निश्चित करणे, स्विच करणे, हस्तांतरीत करणे हा पण एक चांगला पर्याय ठरु शकतो. रेपो दरात कपात झाली तर तुमचा ईएमआय पण कमी होईल.
  3. तुम्ही मासिक ईएमआय कमी करु इच्छित असाल तर तुम्हाला कर्जाचा कालावधी वाढवावा लागेल. त्याआधारे तुमचा मासिक हप्ता कमी करता येईल. पण यामध्ये सरतेशेवटी तुम्हाला बँकेला अधिक रक्कम द्यावी लागते हे लक्षात ठेवा.
  4. तुम्हाला बँकेकडून कुठलीही सवलत अथवा सुविधा मिळत नसेल. तुमच्या गृहकर्जावरील व्याजाबाबत बँक दिलासा देण्यास तयार नसेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेत गृहकर्ज हस्तांतरीत करु शकता. पण त्यापूर्वी संबंधित बँकेचे व्याजदर आणि छुपे शुल्क जरुर समजून घ्या.
  5. गृहकर्ज घेताना कर्जाची अतिरिक्त परतफेड करण्याची बोलणी झाली असेल तर ही प्रक्रिया तुमच्या पथ्यावर पडू शकते. वर्षाला, दोन वर्षाला अथवा तुमच्या सवडीनुसार तुम्ही अतिरिक्त मोठा हप्ता चुकवून व्याजदर कमी करुन घेऊ शकत. काहीजण वर्षाला एक ते दोन जादा ईएमआय जमा करतात. परिणामी ईएमआय कमी होऊ शकते.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.