सोशल मीडियाच्या जमान्यातही ग्राहकांचा सर्वाधिक विश्वास वर्तमानपत्रातील जाहिरातींवरच; वाचा काय म्हणते हॉर्वर्ड बिझनेस रिव्हूचे सर्वेक्षण
आजही ग्राहकांची पसंती ही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींनाच असल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. सुमारे 82 टक्के लोकांनी वृत्तपत्रातील जाहिराती या विश्वासू असल्याचे म्हटले आहे.
मुंबई : सध्या जाहिरातींचा (advertising) जमाना आहे. आज प्रत्यक जण आपल्या वस्तूंची, उत्पादनाची आकर्षक पद्धतीने जाहिरात करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक ग्राहक (Customer) ही जाहिरात पाहूनच संबंधित उत्पादनाकडे आकर्षित होतात आणि उत्पादनाच्या विक्रीमध्ये वाढ होते. जाहिरातीचे अनेक माध्यम आहेत. टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र, डोअर टू डोअर जाहिरात, पॉम्पेट अशा विविध माध्यमातून व्यवसायिक आपल्या वस्तूंची जाहिरात करत असतो. आता त्यात आणखी एका नव्या माध्यमाची भर पडली आहे. ती म्हणजे सोशल मीडिया सध्याच्या जमान्यात सोशल मीडिया हे खूप सशक्त असे माध्यम बनले आहे. अवघ्या काही रुपयांच्या मोबदल्यात उत्पादक आपल्या उत्पादनाची जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. मात्र यातील सर्वाधिक विश्वासू जाहिरातीचे माध्यम कोणते असा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? त्याचे उत्तर नुकतेच हॉर्वर्ड बिझनेस रिव्हूच्या (Harvard Business Review) माध्यमातून समोर आले आहे. सोशल मीडियाच्या युगातही वृत्तपत्रांमधील जाहिरातीलाच ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे.
82 टक्के ग्राहकांची वृत्तपत्राला पसंती
सर्वात विश्वासू जाहिरातीचे माध्यम कोणते? याबाबत हॉर्वर्ड बिझनेस रिव्हूच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले की, तब्बल 82 टक्के लोकांनी वृत्तपत्रातील जाहिरातींचा पर्याय निवडला. हे सर्वेक्षण करताना ग्राहकांना विविध जाहिरातींच्या माध्यमांचे पर्याय देण्यात आले होते. त्यामध्ये रेडियो, टीव्ही सोशल मीडिया, वृत्तपत्रे अशा विविध माध्यमांचा समावेश होता. यामधील जवळपास 82 टक्के ग्राहकांनी वर्तमानपत्रातील जाहिरातींवर विश्वास व्यक्त केला आहे. वर्तमानपत्रानंतर टीव्ही, रेडिओ यामाध्यमातून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर विश्वास असल्याचे ग्रहकांनी सांगितले. मात्र या स्पर्धेत सोशल मीडिया काहीसा मागे पडला आहे.
अहवाल काय सांगतो?
जाहिरातींचे सर्वात सशक्त आणि विश्वासू माध्यम कोणते याबाबत हॉर्वर्ड बिझनेस रिव्हूच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, ग्राहकांचा अद्यापही सर्वाधिक विश्वास हा वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींवर आहे. तब्बल 82 टक्के ग्राहकांनी वर्तमानपत्रातील जाहिरातींवर विश्वास व्यक्त केला आहे. त्याखालोखाल टीव्ही आणि रेडियो या माध्यामातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींना ग्राहकांनी पसंती दिली आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियाला तब्बल 57 टक्के ग्राहकांनी नापसंती दर्शवली. सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या जाहिराती या विश्वासू नसतात असे त्यांचे म्हणणे आहे.