Marathi News Business Ex Dividend Stocks Not just the rain of money! Be ready for earnings, and big gains from companies from Infosys to L&T
Ex Dividend Stocks | आज आनंदी आनंद झाला! या कंपन्या लावणार लॉटरी
Ex Dividend Stocks | कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीचा हंगाम सुरु झाला आहे. कंपन्या प्रत्येक तिमाहीत त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतात. किती मोठी उडी घेतली. काय उणे कुठे बाजी मारली याचा ताळेबंद मांडतात. अशावेळी सहाजिकच या कंपन्या फायदा झाल्यास गुंतवणूकदारांना पण त्यात वाटेकरी करुन घेतात. आता तोच आनंदाचा क्षण आला आहे...
Follow us on
नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना किती सांगू आणि कोणाला सांगू असा अनुभव येणार आहे. अनेक कंपन्या त्यांचा लेखाजोखा मांडणार आहे. दुसऱ्या तिमाहीचे निकाल यायला लागले आहेत. गेल्या आठवड्यात काही कंपन्यांनी त्यांची कामगिरी सर्वांसमोर मांडली. त्यात लाभांश, बोनस शेअरची उधळण करण्यात आली. गुंतवणूकदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला. काहींना मोठी लॉटरी लागली. काही कंपन्या या आठवड्यात शेअरधारकांना आनंदाचा धक्का देतील. डिव्हिडेंड, बोनस आणि शेअर स्प्लिटच्या लाटेत गुंतवणूकदार हरकून जातील. त्यांना मोठा फायदा होणार आहे.
या कंपन्या करतील मालामाल
या आठवड्यात आयसीआयसीआय लोम्बार्ड, एलअँडटी टेक, इन्फोसिस या कंपन्या एक्स डिव्हिडंडच्या माध्यमातून कमाईची संधी देतील. बाजारात अनेक कंपन्याच्या घाडमोडींना वेग आला आहे. या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकालात लाभांश, बोनस शेअर, शेअर स्प्लिटचे बक्षिस मिळू शकते. त्यासाठी तारीख निश्चित करण्यात येते. त्यालाच एक्स-डिव्हिडेंड डेट म्हणतात.
हे सुद्धा वाचा
एक्स डिव्हिडेंड शेअर्सची यादी
इन्फोसिस (Infosys) : आयटी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या संचालक मंडळाने 18 रुपये प्रति शेअरचा लाभांश जाहीर केला आहे. हा शेअर 25 ऑक्टोबर रोजी एक्स-डिव्हिडंड देईल.
केसोल्व्स इंडिया लिमिटेड (Ksolves India Ltd) : 7 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 26 ऑक्टोबर
टीसीआय एक्सप्रेस लिमिटेड (TCI Express Ltd) : 3 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 26 ऑक्टोबर
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ICICI Lombard General Insurance Company Ltd) : 5 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर