Russia-Ukraine war : भारतातून गहू, साखरेची निर्यात वाढली, भावात तेजीचे संकेत

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. युद्धामुळे पुरवठा साखळी प्रभावीत झाली आहे. खाद्य पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होताना दिसत आहे. मात्र हे सर्व वातावरण भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांच्या पथ्यावर पडणारे आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षात रेकॉर्डब्रेक साखरेची निर्यात (export) झाली आहे.

Russia-Ukraine war : भारतातून गहू, साखरेची निर्यात वाढली, भावात तेजीचे संकेत
केंद्र सरकारने गहू निर्यातबंदीचा निर्णय घेतला असून व्यापाऱ्यांनी त्याचे स्वागत केले आहे.Image Credit source: TV9 (फाइल फोटो)
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 9:11 AM

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. युद्धामुळे पुरवठा साखळी प्रभावीत झाली आहे. खाद्य पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होताना दिसत आहे. मात्र हे सर्व वातावरण भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांच्या पथ्यावर पडणारे आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षात रेकॉर्डब्रेक साखरेची निर्यात (export) झाली आहे. त्याच प्रमाणात गव्हाची देखील निर्यात वाढली असल्याचे खाद्य सचिव सुधांशु पांडे यांनी म्हटले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या आर्थिक वर्षात भारताने प्रचंड प्रमाणात साखरेची निर्णयात (sugar export) केली आहे. आर्थिक वर्ष 2020-2021 च्या तुलनेत मागील आर्थिक वर्षात आपण अधिक साखरेची निर्यात तसेच उत्पादन केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. यंदा आपण साखर निर्यातीमध्ये 80 लाख टनाचा टप्पा गाठू असा विश्वासही यावेळी पांडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच एप्रिल 2022 पासून ते जुलै 2022 पर्यंत भारत 30 ते 35 लाख टन गव्हाची (Wheat) निर्यात करणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

80 लाख टन साखरेच्या निर्यातीचा अंदाज

सुधांशु पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 80 लाख टनांपेक्षा अधिक साखरेची निर्यात होण्याची शक्यता आहे. 2020-21 मध्ये भारताने 72.3 लाख टन साखरेची निर्यात केली होती. भारत हा साखर उत्पादक देशांपैकी एक प्रमुख देश आहे. भारतामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होते. मात्र म्हणावी तशी विक्री होताना दिसत नाही. यंदा परिस्थिती वेगळी आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत मोठा फेरबदल झाला आहे. अन्न, धान्याचा पुरवठा साखळी प्रभावीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताला आपले उत्पन्न इतर देशात निर्यात करण्याची मोठी संधी मिळाली असून, साखरे सोबतच गव्हाची देखील निर्यात वाढली आहे.

साखरेची निर्यात वाढण्याची अन्य कारणे

भारत हा साखर उत्पादक देशांपैकी एक प्रमुख देश आहे. भारतामध्ये दरवर्षी लाखो टन साखरेचे उत्पादन केले जाते. भारताप्रमाणेच इतर देशात देखील साखरेचे उत्पादन केले जाते. मात्र सध्या जगभरात उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. बराचसा ऊस हा इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जातो. त्यामुळे साखरेचे म्हणावे तेवढे उत्पादन होत नाही. भारतात देखील इथेनॉल निर्मितीला सुरुवात झाली आहे. मात्र देशात इथनॉल निर्मितीचे प्रमाण कमी आहे. साखर निर्मितीवरच भर दिला जातो. त्यामुळे भारताच्या साखरेला जगभरात मागणी वाढली असून, निर्यातीमध्ये वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

Petrol-Diesel Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सलग तीसऱ्या दिवसी इंधनाचे दर स्थिर

नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका; आरबीआयची अ‍ॅक्सिस, आयडीबीआय बँकेवर कारवाई

Inflation: पेट्रोल, डिझेलची दरवाढ सर्वसामान्यांच्या मुळावर, महागाईत भरमसाठ वाढ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.