हक्काच्या घराचा मार्ग सोपा होणार, 2021-22 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान घरकुल योजनेसाठी भरभक्कम तरतूद?

यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात PMAY योजनेसाठी अधिकच्या निधीची तरतूद करण्यासाठी हालचाली सुरु आहेत.

हक्काच्या घराचा मार्ग सोपा होणार, 2021-22 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान घरकुल योजनेसाठी भरभक्कम तरतूद?
पीएम आवास योजनेसंदर्भात काही समस्या असल्यास 'येथे' करा तक्रार
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 10:47 PM

नवी दिल्ली : शहरी भागांमध्ये अजूनही अनेक लोक झोपडीत, भाड्याच्या घरात किंवा कच्चा घरांमध्ये राहतात. याच नागरिकांना आपल्या हक्काचं घर देण्यासाठी सुरु झालेल्या पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत यंदा अधिक लोकांना आपल्या हक्काचं घर मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी अधिकच्या निधीची तरतूद करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. यामागे 2022 पर्यंत सर्वांना आपलं हक्काचं घर मिळवून देण्याच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचं ध्येय आहे (Extra fund Provision for PMAY in Budget 2021-22) .

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारला अधिकाधिक लोकांना त्यांचं घर उपलब्ध करुन द्यायचं आहे. यातून सरकारचं प्रत्येकाल घराचं स्वप्न 2022 पर्यंत पूर्ण करायचं आहे. त्यासाठीच मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात या घरकुल योजनेसाठी 8,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, नंतर नोव्हेंबरमध्ये यासाठी अतिरिक्त 18,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. असं असलं तरी यंदा नेमकी किती अधिकचा निधी मिळणार हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. ते 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातच स्पष्ट होईल.

पंतप्रधान घरकुल योजनेत किती मदत मिळते?

ज्या लाभार्थ्यांचं नाव पीएमएवाय शहराच्या यादीत येईल त्यांना केंद्र सरकारकडून घर खरेदी करण्यासाठी 2.35 लाख रुपयांपासून 2.50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजावर अनुदान मिळतं. आर्थिक मागास किंवा उत्पादन कमी असणाऱ्यांसाठी या योजनेंतर्गत 6 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन दिलं जातं. तसेच योजनेत 2.67 लाख रुपयांच्या कर्जासाठी 6.50 टक्के व्याजावर अनुदान दिलं जोतं. एमआयजी 1 आणि एमआयजी 2 ग्रुपमधील व्यक्तींना 20 वर्षांच्या कर्जावर 4 टक्के आणि 3 टक्के व्याजाचं अनुदान दिलं जातं. एकूणच एमआयजी 1 आणि एमआयजी 2 ग्रुपला 2.35 लाख रुपये आणि 2.30 लाख रुपयांचं अनुदान मिळतं.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं?

ज्या नागरिकांनी मागील वर्षभरात पंतप्रधान घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेत त्यांचा या योजनेसाठीच्या लाभार्थी यादीत समावेश करण्यात आलाय. या यादीतील लोकच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. देशातील कोणताही नागरिक PMAY अंतर्गत अर्ज करु शकतो. यानंतर संबंधिताचं नाव या यादीत समाविष्ट करण्यात येईल.

हेही वाचा :

‘नोकरी’वरून सरकारची चहूबाजूंनी कोंडी; बजेटमध्ये मोठ्या घोषणेची शक्यता

Budget 2021 : अनेक वस्तूंवरील सीमा शुल्क घटण्याची शक्यता, कोणत्या वस्तू स्वस्त होणार?

Budget 2021 : तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय? मग ही बातमी वाचा

व्हिडीओ पाहा :

Extra fund Provision for PMAY in Budget 2021-22

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.