डेटा विकणं तेल विकण्यासारखं नाही, फेसबुकचं मुकेश अंबानींना उत्तर
"डेटा काही तेल नाही, भारताने इतर डेटा देशातच रोखण्याशिवाय इतर देशातही मुक्तपणे त्याचा प्रवाह करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी प्रत्युत्तर फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेय यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींना दिले.
नवी दिल्ली : “डेटा काही तेल(data is the new oil) नाही. भारताने इतर डेटा देशातच रोखण्याशिवाय इतर देशातही मुक्तपणे त्याचा प्रवाह करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी प्रत्युत्तर फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेय यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींना (Countering Reliance Industries Chairman Mukesh Ambani) दिले. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींनी डेटा हे तेलाप्रमाणे आहे. त्याचा वापर आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी भारतीयांकडे (allow free flow of data) असले पाहिजे असे म्हटंल होतं. त्यावर निक क्लेग (Nick Clegg) यांनी उत्तर दिलं आहे.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी डेटा सार्वजनिक करणे हे सामान्य आहे. भारताने इंटरनेटसाठी एक नवीन जाळं तयार केलं पाहिजे. जे व्यक्तिगत अधिकाऱ्याचा सन्मान करेल. त्यासोबच प्रतिस्पर्ध्यांना आणि नवाचारला प्रोत्साहित करतील. तसेच हा डेटा सर्वांसाठी मुक्त आणि सहज (data is the new oil) उपलब्ध असावे, असेही निक क्लेग म्हणाले.
काय म्हटले होते मुकेश अंबानी?
“काही दिवसांपूर्वी डेटा हे तेलाप्रमाणे (data is the new oil) आहे. त्याचा वापर आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी भारतीयांकडे असले पाहिजे. सद्यस्थितीत डाटा कंपनींची विशेष रुप हे विदेशी कंपन्यांकडे आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी ही परदेशी कंपन्यांकडे नसावा,” असे वक्तव्य मुकेश अंबानीने केले होते.
त्या वक्तव्यावर क्लेगने एका कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले आहे. भारत आणि संपूर्ण जगभरातील अशी काही लोक आहेत, ती डेटाला तेल समजतात. त्यांच्या मते, अशा तेलाचे (data is the new oil) म्हणजेच डेटाचे देशाच्या सीमेपर्यंत राखून ठेवल्यास समृद्धी होईल. मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे.
डेटा हा तेलाचा व्यवसाय नाही
“डेटा म्हणजे कोणत्या तेलाचा व्यवसाय नाही, जे जमिनीतून काढून त्याचे नियंत्रण आपल्या हातात ठेवता येईल आणि त्याचा व्यवसाय केला जाईल. देशभरात डेटाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे डेटा देशाच्या सीमेपर्यंत जर रोखून ठेवले आणि दुसऱ्या देशात त्याचा प्रवाह होण्यापासून रोखले. तर डेटाचा विशाल समुद्र एखाद्या तलावप्रमाणे होईल,” असंही क्लेगने म्हटले आहे.