Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact check | ‘पीएम निवृत्ती वेतन योजने’तून खरंच 70 हजार रुपये मिळणार?

कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच पीएम पेन्शन योजनेच्या नावाने एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

Fact check | 'पीएम निवृत्ती वेतन योजने'तून खरंच 70 हजार रुपये मिळणार?
वारंवार रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 12:54 PM

नवी दिल्ली: ‘पंतप्रधान निवृत्ती वेतन योजना 2020 (PM pension yojna 2020)चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करावी लागेल’. असा मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, निवृत्तवेतन धारकांना अशी कुठलीही योग्यता सिद्ध करावी लागणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज चुकीचा असल्याचा दावा खुद्द भारत सरकारचं अधिकृत ट्विटर हॅन्डल पीआयबी फॅक्ट चेक (PIB fact check)ने केला आहे. त्यामुळे अशा मेसेजेपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. (False message goes viral regarding PM pension scheme)

कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवण्याचं प्रमाण वाढलं आहे. यापूर्वीही असे अनेक मेसेज आणि बातम्या सोशल मीडियातून पसरवण्यात आल्या होत्या. त्यात विधवा महिला समृद्धी योजनेच्या नावानेही एक मेसेज होता. केंद्र सरकार या योजनेअंतर्गत विधवा महिलांच्या बँक खात्यात 5 लाख रुपये आणि शिलाई मशीन देत असल्याचा तो मेसेज होता. पीआयबी फॅक्ट चेककडून ही बातमीही खोटी असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर केंद्र सरकारने अशी कुठलीही योजना सुरु केली नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

नेमका मेसेज काय?

अनेक लोकांना पाठवण्यात आलेल्या खोट्या मेसेजमुळे नाहक मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. असाच एक मेसेज निवृत्ती वेतनाबाबत सध्या पसरवला जात आहे. ‘अभिनंदन! तुम्ही पंतप्रधान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 70 हजार रुपयांचे लाभधारक झाला आहात. नियम आणि अटींसह आपले डिटेल्स वेरिफाय करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा’, असा तो मेसेज आहे. PIB ने या व्हायरल होत असलेल्या मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारद्वारे ‘पीएम निवृत्ती वेतन योजना 2020’ अशा नावाची कुठलीही योजना सुरु नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

तुम्हीही पडताळणी करु शकता

आपल्याला एखादा मेसेज खोटा वाटत असेल किंवा एखाद्या मेसेजची तुम्हाला पडताळणी करायची असेल तर https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 अथवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. ही माहिती पीआयबी वेबसाईट https://pib.gov.in वरही उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या:

मोदी सरकार चीनला आणखी एक झटका देणार?; आता आत्मनिर्भर भारत करण्यासाठी आणखी एक पाऊल

पैशांची गुंतवणूक करायची तर, या सरकारी योजना अगोदर पाहा…

False message goes viral regarding PM pension scheme

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.