FactCheck : 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चालणार की नाही? RBIकडून स्पष्ट
RBIने स्पष्ट केलंय की 100, 10 आणि 5 रुपयांच्या सर्व नोटा वैध आहेत आणि ते चलनात कायम राहतील.
मुंबई : RBIचे असिस्टंट मॅनेजर बी महेश यांच्या एका वक्तव्याचा आधारावर शनिवारी माध्यमांमध्ये एक बातमी वेगानं पसरली. रिझर्व बँक लवकरच 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाहेर करण्याचा निर्णय घेणार असल्याची ही बातमी आहे. माध्यमांमध्ये पसरलेल्या या बातमीवर आता रिझर्व्ह बँकेनं एक स्पष्टीकरण दिलं आहे. असा कुठलाही निर्णय घेतला गेला नाही, असं RBI कडून सांगण्यात आलं आहे. PIBनेही त्याबाबत एक ट्वीट करुन माहिती दिली आहे.(The RBI has no plans to close old Rs 100, Rs 10 and Rs 5 notes)
RBIने स्पष्ट केलंय की 100, 10 आणि 5 रुपयांच्या सर्व नोटा वैध आहेत आणि ते चलनात कायम राहतील. सध्या या नोटा चलनातून बाहेर करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिलनंतरही 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटाही बाजारात सुरु राहतील. दरम्यान RBI कडून 5, 10 आणि 100 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. बाजारात सध्या नव्या आणि जुन्या नोटा चालू आहेत.
एक खबर में दावा किया जा रहा है कि आरबीआई द्वारा दी गई जानकारी के अनुसार मार्च 2021 के बाद 5, 10 और 100 रुपए के पुराने नोट नहीं चलेंगे।#PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। @RBI ने ऐसी कोई घोषणा नहीं की है। pic.twitter.com/WiuRd2q9V3
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 24, 2021
बाजारात सर्व नव्या नोटा उपलब्ध
नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेकडून 2000, 500, 200, 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आताही जुन्या नोटा वैध आहेत आणि त्या चलनातही आहेत. RBI कडून 5 जानेवारी 2018 ला 10 ची नोट जारी करण्यात आली होती. जुलै 2019 मध्ये 100ची नवी नोट जारी करण्यात आली होती. त्याचबरोबार 20 रुपयांची नवी नोटही चलनात आणली. तर 50 ची नवी नोट 18 ऑगस्ट 2017 ला जारी करण्यात आली होती. 25 ऑगस्ट 2017 ला 200 रुपयांची नवी नोट जारी करण्यात आली होती. नोटबंदीनंतर लगेच 10 नोव्हेंबर 2016 ला 500 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. त्याच दिवशी 2000 रुपयांची नोटही जारी करण्यात आली होती.
संपूर्ण देशात चलनाचं वाटप कसं होतं?
संपूर्ण देशात चलनाचं वाटप हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बनवण्यात आलेल्या करन्सी चेस्टच्या मदतीनं केलं जातं. हा करंन्सी चेस्ट बँकांच्या मोजक्याच शाखेमध्ये उपलब्ध असतो. RBIच्या वार्षिक अहवाल 2017- 18 नुसार चलनाच्या वाटपासाठी 19 इश्यू ऑफिस, 3975 करन्सी चेस्ट आणि 3654 स्मॉल क्वॉईन डिपॉट आहेत. एप्रिल 2019 मध्ये RBIने एक नियमावली जारी केली होती. त्यानुसार करन्सी चेस्टचा आकार कमीत कमी 1500 क्वेअर फिट असावा. डोंगरावर हा एरिया 600 स्क्वेअर फूट असला पाहिजे. RBIकडून गठीत करण्यात आलेल्या समितीकडून सल्ला देण्यात आला होता की, एका चेस्टची क्षमता कमीत कमी 1 हजार कोटी रुपये असावी.
RBI करते नोटांची छपाई
करन्सी चेस्टला मॅनेज करण्याची संपूर्ण जबाबदारी आणि अधिकार पूर्णपणे रिझर्व्ह बँकेकडे असतो. RBI केंद्र सरकारला सल्ला देतं की, किती नंबर ऑफ नोटा छापायच्या आहेत. करन्सी डिनॉमिनेशन काय होईल आणि त्याची किती छपाई करायची आहे. त्याचबरोबर नोटांच्या सुरक्षेबाबातही RBI निर्णय घेत असतं.
संबंधित बातम्या :
आता 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद, पण त्याआधी वाचा ‘हा’ नियम
जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत, RBI ची माहिती
The RBI has no plans to close old Rs 100, Rs 10 and Rs 5 notes